आमचा अंदाज खरा ठरला ! केज मतदार संघात शरद पवार आलेच नाहीत

सब टायटल: 
याचा फायदा कोणाला तोटा कोणाला ? निवडणूक निकालानंतरच कळेल
Rajkiya

.

   ,         अंबाजोगाई (प्रतिनिधी )- 

बीड जिल्ह्याच्या राजकारणावर शरद पवार यांची गेल्या अनेक वर्षापासून पकड मजबूत आहे जिल्ह्याने एकदा पवारांना साथ दिली तर दुसऱ्या टर्मला स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांना साथ दिल्याचे अनेक वेळा समोर आले आहे यावेळी शरद पवारांचे थोडे गणित चुकलेच अशी चर्चा जिल्ह्यात होत असताना पवारांचे परळी व केज मतदार संघावर विशेष लक्ष राहील असे वाटत असताना पवारांची परळीला सभा झाली मात्र केज मध्ये पवार आलेच नाहीत याचा फायदा कोणाला ? हे निवडणूक निकालानंतर समजेल अशी चर्चा मतदारातून होताना ऐकवयास मिळत आहे 

            बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात नेत्यांच्या सभा झाल्या तर त्याचा परिणाम राजकीय परिस्थितीवर होतो अशी प्रामुख्याने दोन राजकीय नेत्यांची नावे घेतली जातात त्यात पहिले शरद पवार व दुसऱ्या भाजपाच्या नेत्या पंकजाताई मुंडे आहेत बीड जिल्ह्यातील जनतेने यापूर्वी अनेक वेळा शरद पवारांच्या शब्दाखातर त्या उमेदवाराच्या बाजूने कौल दिला त्यापैकी स्वर्गीय डॉ विमलताई मुंदडा एक होत्या पवारांनी त्यांना आमदार, राज्यमंत्री ,कॅबिनेट मंत्री केले दुसऱ्या नेत्या पंकजाताई मुंडे आहेत त्यांनी केज, अंबाजोगाई मध्ये सभा घेतल्या विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सारख्या दिग्गज नेत्याची त्यांच्या प्रयत्नातून सभाही झाली पंकजाताई मुंडे यांनी केज तालुक्यात न भूतो न भविष्यती अशी भव्य जाहीर सभा केली अनेकांच्या मते ही सभा मतदार संघाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करू शकते असा अंदाज बांधला जातो बघू येत्या 23 नोव्हेंबर नंतर काय परिणाम दिसतो ते