केज विधानसभा मतदारसंघात आडसकर गटाची भूमिका काय ?

सब टायटल: 
खासदार बजरंग सोनवणे यांनी केलेल्या आडसकर विरोधामुळे मुंदडा गटाचे लक्ष
Rajkiya

.

             अंबाजोगाई (प्रतिनिधी )-

केज विधानसभा मतदारसंघात मुंदडा-साठे अशी प्रतिष्ठेची लढत होत आहे केज विधानसभा मतदारसंघात आडसकर गटाचे स्वतंत्र अस्तित्व आहे हे कोणीही मान्य करेल माजलगाव विधानसभेची तुतारीची उमेदवारी आडसकर यांना न मिळण्यामागे खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांचा हात असल्याचा संशय आडसकर गटाला वाटतो नव्हं दोषी समजतो यामुळे केज मतदार संघात आडसकर गटाची भूमिका काय ? अशी चर्चा होत आहे मुंदडा गटाला याचा फायदा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे 

                 माजलगाव मतदार संघातून शरद पवार गटाची उमेदवारी मिळावी यासाठी रमेश आडससकरांनी प्रवेश केल्यानंतर सुद्धा तुतारीची उमेदवारी मिळू नये यासाठी आडसकरांचे राजकीय विरोधक असणारे खासदार बजरंग सोनवणे यांनी टोकाची भूमिका घेऊन विरोध केला त्यामुळे आडसकराना माजलगावची विधान सभेची उमेदवारी मिळू शकली नाही असा आडसकर समर्थकांचा आरोप आहे त्यामुळे आडसकरांना अपक्ष उमेदवारी दाखल करावी लागली व ते लढवत आहेत ही सल आडसकर गटाला कायम सतावत असल्याचे समजते 

                 रमेश आडसकराना उमेदवारी मिळू नये यासाठी टोकाचा विरोध करणाऱ्या खासदार बजरंग सोनवणे यांच्या म्हणण्यावर केज मतदार संघातील आडसकर गट शरद पवार गटाच्या उमेदवाराला मदत कसा करेल ? असा सवाल उपस्थित केला जात आहे त्यामुळे केज मतदार संघातील आडसकर गट केज विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार आमदार नमिताताई मुंदडा यांच्या बाजूने आपल्या मतदानाचे योगदान देण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे बघू काय निर्णय होतो किंवा आडसकर गट काय भूमिका घेते ते !