बजरंग बप्पा मुस्लिम समाजाने तुम्हाला अपेक्षा न ठेवता मते दिली त्या मतदारांना साधा शुक्रिया तरी !

.
अंबाजोगाई (प्रतिनिधी )-
बीड लोकसभा निवडणुकीत कोणीही अपेक्षा न ठेवता जिल्ह्यातील तमाम मुस्लिम समाजाने बजरंग बप्पा सोनवणे यांच्या पारड्यात आपली मते टाकली सोनवणे निवडून आल्यानंतर अपेक्षा न ठेवता मते देणाऱ्या मुस्लिम समाजाला साधे शुक्रिया (आभार) तरी मानायचे औदार्य दाखवले नाही पुन्हा विधानसभा निवडणुकीत तुम्ही या समाजाकडून मताची अपेक्षा ठेवता ? आमची मते हवी असतात मग विकास निधी देताना भेदभाव का करता ? असा खडा सवाल अंबाजोगाई शहरातील तमाम मुस्लिम समाजाच्या तरुणांनी आघाडीच्या नेत्यांना केला आहे
मुस्लिम समाज आता सुशिक्षित झाल्याने मतदान कोणाला करायचे कोणालाही सांगायची गरज नाही प्रत्येक मतदार आपला निर्णय स्वतः घेत आहे असाही दावा या तरुणानी केला त्यांच्या मते राजकारणात सध्या एकच चर्चा सुरू असते मुस्लिम मतदाराचा कौल कोणाकडे ? सध्या विधानसभा निवडणूक सुरू आहे केज विधानसभा मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारात तगडी फाईट होत आहे अंबाजोगाई शहराचा विचार केला तर मुंदडा यांच्याकडे गेली अनेक वर्षापासून आमदारकी आहे त्या राष्ट्रवादी पक्षात असो की भाजपामध्ये त्यांनी सर्व समाजाला सतत समान निधी वाटप करत प्रत्येक समाजाची धार्मिक स्थळे असो वार्डातील रस्ते समतोल विकास राखण्याचा प्रयत्न केला आहे दुसरे विशेष म्हणजे अंबाजोगाई शहरात गंगा जमुनी तहजीब कायम राहावी यासाठी मुंदडा कुटुंबाकडे सत्ता असो वा नसो ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतात अंबाजोगाई शहरातील मुख्य रस्ते असो की मग रोशन कॉलनी ,हर्ष कॉलनी सह अनेक मुस्लिम बहुल भागातील सिमेंट रस्ते व नाल्या झाले आहेत विविध योजनेत सतत समानता ठेवत अनेक मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याचाही प्रयत्न मुंदडा कुटुंबाने गेली अनेक वर्षात केला आजही करत आहेत भविष्यात करतील अशी अपेक्षा या तरुणांना वाटते
तरुणांचे म्हणणे आले खासदार बजरंग बप्पाची निवडणूक होऊन सहा महिने झाले निधी देण्याचे सोडा समाजाचे किमान प्रश्न तरी समजून घ्यायला हवे होते तेही झाले नाही दुसरे माजी आमदार उमेदवार आहेत त्यांनी अंबाजोगाई शहरात करोडो रुपयांचा निधी शासनाकडून आणला एकाच ठिकाणी करोडो रुपये खर्च केले. मात्र अनेक वेळा मागणी करून सुद्धा साध पाच लाख रुपयांचा निधी इतरत्र दिला नाही तरीही त्यांना अल्पसंख्याक समाजाची मते हवी आहेत मात्र एवढा विसरभोळा समाज नसल्याचा इशारा या तरुणांनी आघाडीच्या उमेदवाराला दिला आहे
तिसरे नेते आहेत माजी नगराध्यक्ष 15 ते 20 वर्षापासून एकतर्फी अंबाजोगाई शहरातील मुस्लिम समाज त्यांच्या पाठीशी राहिला वीस वर्षात अंबाजोगाई नगर परिषदेच्या मार्फत एखाद्या मुस्लिम बहुल समाजाच्या वस्तीमध्ये कोणती योजना दिली कोणत्या भागातील रस्ते केले असा सवाल करत आमची मते चालतात मात्र आमच्या भागाचा विकास करण्यासाठी निधी देताना भेदभाव केला जातो असाही गंभीर आरोप करत तुमचा राजकीय विरोध मुंदडाना असू शकतो त्यासाठी आमचा वापर कदापि होऊ देणार नाही असा निर्वाणीचा इशाराही मुस्लिम समाजाच्या अनेक तरुणांनी यावेळी बोलताना दिला