शरद पवार यांची केज मतदार संघात जाहीर सभा नाही ?

.
अंबाजोगाई (प्रतिनिधी )-
शरद पवार असो की अजितदादा पवार तसेच भाजपाच्या पंकजाताई मुंडे, धनंजय मुंडे या चार नेत्याच्या बीड जिल्ह्यातील ज्या भागात सभा होतील त्या भागातील मतदारावर नक्की परिणाम होतो असा मतदारांमध्ये कयास बांधला जातो हा आजपर्यंतचा इतिहास आहे केज विधानसभा मतदारसंघात येत्या सहा दिवसात शरद पवार यांची सभा होण्याची शक्यता कमी दिसत असल्याने केजच्या विद्यमान आमदार नमिताताई मुंदडा यांच्यासाठी शुभ संकेत मानले जात आहेत
महाराष्ट्रात शरद पवारांच्या नेतृत्वाचा दबदबा आजही कायम आहे त्यांच्या नेतृत्वाला झुगारून बंड करणाऱ्या नेत्यांच्या मतदारसंघात शरद पवारांनी ठरवून जाहीर सभा घेतल्या राजकीय जाणकारांच्या मतानुसार अनेकांना अपेक्षा होती शरद पवार यांची केज, नेकनुर अथवा अंबाजोगाई येथे जाहीर सभा होईल मात्र केज येथे काल प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची सभा झाली त्यामुळे आता केज विधानसभा मतदारसंघात बड्या नेत्याच्या सभेची शक्यता दिसत नाही
केज मतदार संघात आज नितीन गडकरी, पंकजाताई मुंडे यांची अंबाजोगाई मध्ये जाहीर सभा आहे पुढील काळात केज तालुक्यात पंकजाताई मुंडे, धनंजय मुंडे यांच्या सभा होणार असल्याचे समजते त्याचप्रमाणे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांची ही सभा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे एकूण केज विधानसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थितीचा विचार करता विद्यमान आमदार नमिताताई मुंदडा यांच्यासाठी शुभ संकेत मानले जात असल्याची चर्चा मतदारांमध्ये होत आहे