घरातून निघून गेलेल्या तेरा वर्षीय अल्पवयीन मुलाचा केज पोलिसांनी लावला २४ तासात तपास

Crime

 

केज (प्रतिनिधी )- 

केज तालुक्यातील कानडी माळी येथून घरातून निघून गेलेल्या चौदा वर्षीय अल्पवयीन मुलाचा केज पोलिसांनी २४ तासात तपास करून त्याला त्याच्या आई-वडिलांच्या स्वाधीन केले.

या बाबतची माहिती अशी की, दि.१४ रोजी दुपारी १:३० वा च्या दरम्यान बंडू रामभाऊ राऊत यांचा तेरा वर्ष वयाचा मुलगा अमर बंडू राऊत हा घरातून बेपत्ता झाला होता. या प्रकरणी त्याचे वडील बंडू राऊत यांच्या तक्रारी नुसार केज पोलीस ठाण्यात गु. र. नं. २५/२०२३ भा. दं. वि. ३६३ नुसार अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान गुन्हा दाखल होताच केज पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी तात्काळ तपासाची चक्रे हलविली आणि या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांना तपास करण्याचे आदेश दिले 

पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांनी तपास करीत असताना अपहृत अमर राऊत याचा एका अनोळखी मोबाईल वरून फोन आला असल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांनी पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांना  दिली. माहिती मिळताच राजेश पाटील यांनी त्या मोबाईल नंबरचे लोकेशन काढले. सदर मोबाईल हा समर्थ नगर रेल्वे पोलीस ठाणे पुणे परिसरातील असल्याचे निष्पन्न होताच त्यांनी पोलीस नाईक दिलीप गित्ते आणि पोलीस नाईक महादेव बहिरवाळ यांना पुणे येथे रवाना केले. तसेच त्या पुन्हा अमरला त्या फोनवर संपर्क साधला आणि त्याला परत येण्याचे सांगितले.

 

 पोलीस पथक अहमदनगर पर्यंत पोहोचले होते:

अमर राऊत हा अल्पवयीन असल्याने आणि त्याच्या अपहरणाचा गुन्हा दाखल होताच सहाय्यक पोलीस शंकर वाघमोडे आणि पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांनी पोलीस नाईक दिलीप गित्ते आणि पोलीस नाईक महादेव बहिरवाळ हे अहमदनगर पर्यंत पोहोचले होते.

 अमरचे झाले होते आई सोबत भांडण

अमरचे घरगुती कारणावरून आई सोबत भांडण झाले होते. त्या रागातून अमर राऊत हा पुण्याला गेला होता.
 
लोकेशन मिळताच पोलिसांनी व्हीडिओ फुटेज मिळविले  अमर हा पुण्यात असल्याचे निष्पन्न होताच पुणे पोलिसांच्या मदतीने रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज आधारे अमरवर लक्ष ठेवून होते.