मुंदडा यांनी विकास काय केला विचारता स्वतःला विकास पुरुष म्हणवून घेणाऱ्याच्या दारासमोरील रस्ता आमदार नमिता मुंदडानी मंजूर केला

सब टायटल: 
योजनेच्या निधीवरील जनतेवर बोजा टाकल्याचा खोटा आरोप करता 15 कोटी लोकवाटा मुख्यमंत्री निधीतून भरलाय जनतेची दिशाभूल करू नका
Rajkiya

.

          अंबाजोगाई (प्रतिनिधी )- 

केज विधानसभेची निवडणूक सध्या सुरू आहे आमचे विरोधक जनतेची दिशाभूल करत आहेत मुंदडा यांनी काय विकास केला ? असा प्रश्न करत आहेत स्वतःला विकास पुरुष म्हणवून  घेणाऱ्या नेत्याची नगर परिषदेत वीस वर्ष सत्ता होती स्वतःच्या घरासमोरचा रस्ता त्यांना करता आला नाही तो रस्ता आमचे विरोधक असले तरी आमदार नमिता मुंदडानी रस्ता मंजूर केला आहे प्रतिस्पर्धी उमेदवार सुद्धा अनेक सभेत मुंदडानी विकास कुठे केला ? असा प्रश्न उपस्थित करत आहेत मुंदडांनी केलेल्या विकासाच्या रस्त्यावर तुम्ही प्रचार करत फिरत आहात असे उत्तर मतदार त्यांना देत आहेत आमदारकीचे जाऊ द्या दोन वेळा नगरसेवक एक वेळ नगराध्यक्ष होतात स्वतःच्या वार्डाचा विकास करता आला नाही मतदार संघ कसा सांभाळणार ? असा खळबळजनक आरोप युवा नेते अक्षय मुंदडा यांनी अंबाजोगाई शहरातील एका जाहीर सभेत केल्याने मुंदडा विरोधकांना पळता भुई थोडी झाल्याचे समजते 

                 अक्षय मुंदडा यांनी विरोधकांनी केलेल्या आरोपाची सत्यता स्पष्टपणे सांगितल्यामुळे लोकअवाक झाले असल्याचे समजते अक्षय मुंदडा म्हणाले की अंबाजोगाई शहराला स्वर्गीय डॉ विमलताई मुंदडा यांच्यानंतर आमदार नमिता मुंदडा यांनी 200 कोटी पेक्षा जास्त निधीची पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणली यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकू लागल्याने विरोधक जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत अनेक सभेत विकास पुरुष काय म्हणत आहेत पाणीपुरवठा योजनेमुळे अंबाजोगाईच्या जनतेवर बोजा पडला अशी दिशाभूल केली जात आहे मात्र सर्वसामान्य जनतेच्या माहितीसाठी सांगतो 200 कोटी पेक्षा जास्त पाणीपुरवठा योजना मंजूर झाल्यानंतर या योजनेसाठी लोकवाटा 15 कोटी भरावा लागत होता आमदार नमिता मुंदडा यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना विनंती केली नगरपरिषदेच्या आर्थिक परिस्थितीची माहिती सांगितली त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री निधीतून 15 कोटी रुपयांचा लोक वाटा भरला स्वतःला विकास पुरुष म्हणून घेणाऱ्यांना माहिती नसेल तर माहिती घ्या जनतेची  दिशाभूल करू नका असाही मोलाचा सल्ला आपल्या विरोधकांना अक्षय मुंदडा यांनी दिला आहे 

        अंबाजोगाई शहरात रस्ते नालीचे विकास कामे करताना आमची कुठेही प्लॉटिंग नसल्याने तुमच्यासारखे नगर परिषदेमार्फत ठराविक भागात रस्ते आम्ही केले नाहीत तो रस्ता कोणाच्या घरासमोरून जातो हे पाहिले नाही पुढेही पाहणार नाही आमचा उद्देश फक्त विकास झाला पाहिजे एवढाच आहे विकास पुरुषाच्या दारासमोरील रस्ता सुद्धा आम्हीच करणार आहोत असेही अक्षय मुंदडा यानी निक्षून सांगितले 

            सर्वात महत्त्वाचे म्हणजे अंबाजोगाई शहरात चौहीकडे दहा इंच जाडीचे सिमेंट रस्ते होत आहेत आतापर्यंत अंबाजोगाई शहरात एवढ्या जाडीचे रस्त्याची काम झालेली  नव्हते पूर्वी रस्ते झाले की सहा महिन्याच्या नंतर त्याच रस्त्यावर पुन्हा निधी खर्च व्हायचा रस्त्याची जाडीही आजच्यासारखी नव्हती मग शिल्लक जाडी गेली कुठे ? असा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण होत असल्याने जनताच विरोधकांना प्रचाराला गेल्यानंतर सवाल उपस्थित करत आहेत जनतेसमोर सत्य हळूहळू समोर येत असल्याचेही मत अक्षय    मुंदडा यांनी व्यक्त केले