अंबाजोगाई शहरात आमदार नमिता ताई मुंदडानी आमचा विकास केला आमचे मतही मुंदडानाच !

सब टायटल: 
मुंदडा विरोधकांना आमच्या मतावर सत्ता हवी मात्र लाभ इतरांना देणार असे कसे चालेल ?
Rajkiya

.

           अंबाजोगाई (प्रतिनिधी)-  

                  केज विधानसभा मतदारसंघाची सध्या निवडणूक सुरू आहे या मतदारसंघातील अल्पसंख्यांकाचा कौल कोणाकडे ? याचा आढावा घेतला असता शहरातील अल्पसंख्याक समाजातील तरुण मंडळी आमदार नमिताताई मुंदडा यांचा जयजयकार करताना दिसत आहेत अनेक तरुणांनी दावा केला अंबाजोगाई शहर व परिसरात आमदार नमिताताई मुंदडा यांनी जात-पात न पाहता आमच्या भागाचा विकास केला आमची मतही विकासाच्या नावाखाली मुंदडा यांना जाणार आहेत मात्र त्यासोबत उलट सवाल केला की मुंदडा विरोधी भूमिका घेणाऱ्या नेत्यांना आमच्या मतावर अंबाजोगाई नगर परिषदेची सत्ता हवी मात्र आलेल्या सत्तेचा लाभ आम्हाला न देता भलत्यांनाच देण्यात येतो हे आता चालणार नाही असाही सवाल उपस्थित केला 

                 केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिताताई मुंदडा ,ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा ,अक्षय मुंदडा यांनी अंबाजोगाई शहराचा चेहरा मोहरा बदलला त्यांनी गेली अनेक वर्षापासून रस्ते नाल्यापासून ज्या भागाचा विकास झाला नव्हता विशेष करून अल्पसंख्यांक बहुल भागाची अत्यंत दुरावस्था होती रस्त्याने घराच्या बाहेर व बाहेरून घरात जाण्यासाठी रस्ता, नाली नव्हती घाण पाण्यातून घरात प्रवेश करावा लागत होता अनेक वेळा अंबाजोगाई शहराच्या विकास पुरुषांना नागरिकांनी निवेदने दिली मात्र या भागाचा प्रश्न मिटला नव्हता अशा भागात आमदार मुंदडा यांनी लाखो नव्हे करोडो रुपयांचा निधी देऊन परिसराचा चेहरा मोहरा बदलला हा विकास अंबाजोगाई नगर परिषदेवर सत्ता उपभोगनारेही करू शकले असते ते अपेक्षित होते मात्र भलत्याच ठिकाणी विकास पुरुषांनी विकास केला त्यामुळे अल्पसंख्याक समाजाच्या भागात विकास झाला नव्हता मुंदडा यांच्या विकासाने ती दरी भरून निघाली त्यामुळे अंबाजोगाई शहरच नव्हे तर केज ,नेकनूर सह ग्रामीण भागातील अल्पसंख्याक समाजातील अनेक धार्मिक स्थळ ,स्मशानभूमीच्या परिसराचा विकास करण्यासाठी निधी मिळाल्याने अल्पसंख्याक समाजात ओन्ली आमदार नमिता ताई मुंदडा असा गजर होत असल्याने मुंदडा विरोधी अनेक नेत्यांना आश्चर्याचा धक्का बसत आहे 

                अंबाजोगाई शहराचे माजी नगराध्यक्ष मोदी हे कायम मुंदडा विरोधक मानले जातात त्यांनी यावेळी सुद्धा आघाडीचा धर्म न पळता मुंदडा विरोधी राजकीय भूमिका घेतली याबद्दल आपले मत काय ? असा प्रश्न या तरुणांना केला असता तरुणांनी एक ना अनेक प्रश्न उपस्थित केले त्यांच्या मते तुम्हाला अल्पसंख्यांकाची मते चालतात सत्ता तुमच्या हातात होती अल्पसंख्यांकांच्या परिसराचा विकास का करू वाटला नाही ? वैधानिक मंडळ पणन सारख्या पदावर स्वतः किंवा विष्णू सोळुंके सारख्या समर्थकांची शिफारस करता आली त्या ठिकाणी इतरांना संधी का नाही ? एवढेच कशाला अंबाजोगाई नगर परिषदेची सत्ता असताना पाणीपुरवठा वितरण, पाईपलाईन लिकेज, पथदिवे दुरुस्तीचे कंत्राट ,कचऱ्याचे कंत्राट कोण कंत्राटदार आहेत ? सर्वांना माहित आहे आजही तेच कार्यरत आहेत दर महिन्याला लाखो रुपयाचा निधी खर्च केला जातो आपल्या गुणवत्तेवर पाईपलाईन लिकेजचे काम एका अल्पसंख्याक समाजातील तरुणाला मिळाले होते त्याचा कोणी व किती छळ केला ते सर्वांना ठाऊक आहे नगरपरिषद कार्यालयातील विभाग प्रमुखांना पदभार देतानाही सतत अल्पसंख्याक समाजातील कर्मचाऱ्यावर अन्याय एवढा उघड अन्याय तुम्ही करणार तुमच्या राजकीय स्वार्थासाठी मुंदडाना विरोध करणार अल्पसंख्याक समाज आता जागृत झाला आहे आता भुल थापा चालणार नाहीत तरुण सुशिक्षित झाल्याने समाजात जागृती झाली आहे आता समाजाने ठरवले आहे आमचा कौल, मते विकासाला मते आमची विकास भलत्या लोकांचा असा विकास होऊन आम्हाला चालणार नसल्याच्याही प्रतिक्रिया तरुणांनी व्यक्त केल्या