आमदार पंकजाताई मुंडे यांच्या मध्यस्थीने भाजपाच्या नाराज कार्यकर्त्यांची नाराजी दूर झाली

सब टायटल: 
भाजप प्रवक्ते रामभाऊ कुलकर्णी यांच्या घरी रात्री उशिरापर्यंत बैठक पार पडली
Rajkiya

.

         अंबाजोगाई (प्रतिनिधी)-  

केज विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार नमिताताई मुंदडा यांच्या राजकीय विरोधकांनी एकत्र येऊन विरोधी वातावरण निर्मितीचा प्रयत्न केला असला तरी आता भाजपाच्या लोकनेत्या आमदार पंकजाताई मुंडे पूर्ण ताकदीने मैदानात उतरल्या असून काल रात्री उशिरापर्यंत भाजप प्रवक्ते रामभाऊ कुलकर्णी यांच्या घरी केज विधानसभा मतदारसंघातील नाराज असणाऱ्या भाजप कार्यकर्त्या सोबत आ पंकजाताई यांची सकारात्मक चर्चा झाली व ते सर्वजण आजपासून तन मन धनाने आ नमिता ताई मुंदडा यांना विजयी करण्यासाठी कामाला लागणार असल्याचे समजते त्यामुळे पंकजाताई मैदानात उतरल्याने आता मुंदडा विरोधी नेत्यांची पळता भुई थोडी झाल्याशिवाय राहणार नाही अशीही मतदारसंघात चर्चा होत आहे 

                   केज विधानसभा मतदारसंघातून उभ्या असलेल्या आमदार नमिता मुंदडा यांची उमेदवारी मी द्यायला लावली त्यामुळे या मतदारसंघात मी उभी आहे असे समजून सर्व भाजप कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असा संदेश आमदार पंकजाताई मुंडे यांनी यापूर्वीच दिला होता त्यानंतर मतदार संघात जो तो मुंदडा विरोधी नेता उठतो संवाद बैठक बोलवण्याचे नाटक करून मुंदडा विरोधी भूमिका घेतल्याची घोषणा जाहीर करण्याचा सपाटा सध्या सुरू होता दुसरीकडे भाजपातील काही प्रमुख कार्यकर्त्यांची नाराजी होती त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी काल रात्री भाजप प्रवक्ते रामभाऊ कुलकर्णी यांच्या घरी आमदार पंकजाताई मुंडे यांनी भाजपाच्या प्रमुख कार्यकर्त्यांसोबत उशिरापर्यंत विचार विमर्श केल्याचे समजते 

                  भाजपाच्या प्रमुख कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर आमदार पंकजाताई मुंडे यांनी या सर्व कार्यकर्त्यांची नाराजी दूर केल्यानंतर केज मध्ये उमेदवार मी आहे असे गृहीत धरून तन-मन-धनाने कामाला लागा अशा सूचना करताच या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी पंकजाताईंना आश्वासन दिल्याचेही समजते की ताई तुम्हाला केज विधानसभा मतदारसंघातील राजकीय चित्र बदल केल्याशिवाय आम्ही तुम्हाला भेटणार नाही असे अभिवचन दिल्याचे समजते आमदार पंकजाताई मुंडे यांनी आणखीन काही प्रमुख कार्यकर्त्यांना बंद दाराआड चर्चा करून सर्वांना सक्रिय करणार असल्याने भाजप कार्यकर्त्यात नवचैतन्य आल्याची चर्चा होत आहे भाजप प्रवक्ते रामभाऊ कुलकर्णी यांच्या घरी काल रात्री उशिरापर्यंत बैठक झाली या बैठकीला भाजपाचे युवा नेते अक्षय मुंदडा, भाजप प्रवक्ते रामभाऊ कुलकर्णी ,संतोष हांगे, रमाकांत मुंडे, राणा डोईफोडे, विष्णू घुले, विजयकांत मुंडे आदी मान्यवर उपस्थित असल्याचे समजते