पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनच्या कंत्राटाची मोदींनी माहिती घेतली नाही का ?

सब टायटल: 
ही निविदा राष्ट्रीय पातळीवरील होती नगरपरिषदेच्या पातळीवरील नव्हती
Rajkiya

.

           अंबाजोगाई (प्रतिनिधी )- 

दोन दिवसापूर्वी मुकुंदराज सभागृहात संवाद मेळाव्याच्या नावाखाली मुंदडाविरोधी मेळावा आयोजित केला होता अशी सध्या शहरांमध्ये चर्चा सुरू आहे असे ना का या मेळाव्यात माजी नगराध्यक्ष मोदींनी आरोप केला की अंबाजोगाई शहरातील 200 कोटी पेक्षा जास्तीच्या निधीची पाईपलाईन योजनेचे काम करणारी यश कन्स्ट्रक्शन कंपनी पात्र नाही याबाबतीत अधिक माहिती घेतली असता वेगळीच माहिती समोर आली आहे त्यामुळे पाईपलाईनच्या कंत्राटाची मोदींनी योग्य ती माहिती घेतली नव्हती का ?असा प्रश्न निर्माण होतो 

              अंबाजोगाई शहराच्या राजकारणात मोदी-मुंदडा एकमेकांचे राजकीय विरोधक आहेत दोघांनी एकमेकांवर जरूर आरोप प्रत्यारोप करावेत त्याच्याशी सर्वसामान्य जनतेला घेणे देणे नाही मात्र राजकीय विरोधासाठी एखाद्या चांगल्या योजनेचे काम करणाऱ्या एजन्सीला बदनाम करण्याचे प्रयोजन काय ? असाही सवाल नागरिक करत आहेत अंबाजोगाई शहरातील नागरिकांना पिण्याचे पाणी एक आड दिवसाला पाणीपुरवठा व्हावा म्हणून तब्बल 200 कोटी पेक्षा जास्त निधीची ही पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनची योजना आहे या योजनेचे कंत्राटाची निविदा राष्ट्रीय स्तरावर निघाली होती सर्व निविदा ऑनलाइन होत्या देशभरातील कोणतीही एजन्सी ही निविदा भरू शकत होती यश कन्स्ट्रक्शन कंपनीसह दुसरी एक तांत्रिक एजन्सी आहे त्याला टू वेंचर योजनेनुसार निविदा भरली जाते त्यात 51:49 या प्रमाणात भागीदारीमध्ये या योजनेचे काम घेता येते त्यानुसार कायदेशीर बाबी तपासूनच हे काम संबंधित एजन्सीला सुटलेले असताना कुठलीही तांत्रिक माहिती न घेता राजकीय आरोपासारखे योजनेचे काम करणाऱ्या एजन्सीवर आरोप करणे कितपत योग्य आहे ? असाही सवाल नागरिकांतून केला जात आहे अंबाजोगाई नगर परिषदेमध्ये एकाच एजन्सीला गेली दहा ते बारा पंधरा वर्षापासून कंत्राट दिले गेले आहे ते कोणाच्या काळात दिले गेले हे वेगळे सांगण्याची गरज नाही मुदतवाढीच्या नावाखाली गुत्तेदारांना कोण पोसत होते हे जनतेपासून लपून राहिलेले नाही त्यामुळे राजकीय विरोध करण्यासाठी विरोधकावर टीका करायला मुद्दा नसल्याने चांगल्या योजनेचे काम करणाऱ्या एजन्सी पात्र नाही असा आरोप करणे चुकीचे असल्याचेही नागरिकांतून चर्चा होत आहे