शरद पवारांवर टीका करताना आमदार खोत यांची जीभ घसरली

.
अंबाजोगाई (प्रतिनिधी )-
आमदार सदाभाऊ खोत यांनी पडळकर यांच्या सभेत शरद पवार यांच्यावर टीका करताना पवार यांनी महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलायचा यासाठी महाविकास आघाडीला निवडून द्यावे या वक्तव्याचा समाचार घेताना आमदार खोत यांची जीभ घसरली त्यांनी केलेल्या वक्तव्याचा महाराष्ट्रातून निषेध व्यक्त होत आहे अजित दादा पवार यांनी सुद्धा या वक्तव्याचा जाहीर निषेध करून अशा व्यक्तिगत टीकेचा यापुढे योग्य तो समाचार घेतला जाईल असे जाहीर केल्यानंतर आ खोत यांनी दिलगिरी व्यक्त केली
आज अंबाजोगाई शहरांमध्ये बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी आले होते यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार संगीता ताई ठोंबरे उमेदवार माजी आमदार पृथ्वीराज साठे पक्षात प्रवेश न करता साठे यांच्या प्रचारासाठी कामाला लागलेले अनेक नेते यावेळी उपस्थित होते खासदारासह सर्वच नेत्यांनी पत्रकारांशी संवाद साधला मात्र एकानेही आमदार खोत यांच्या पवारावरील वक्तव्याचा निषेध केला नाही विशेष म्हणजे खासदार बजरंग सोनवणे यांच्याकडून अपेक्षा होती मात्र त्यांनाही निषेधाचा विसर पडल्याचे दिसले