खासदार बजरंग सोनवणे केज ऐवजी परळीला पक्षाच्या उमेदवाराचा उमेदवारी दाखल करायला का गेले ?

.
अंबाजोगाई (प्रतिनिधी)-
बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे यांना लोकसभा निवडणुकीमध्ये मताचा पाऊस पाडणाऱ्या प्रमुख कार्यकर्त्यांना खासदारांनी निवडून आल्यानंतर फोनवर बोलताना जो अपमान केला तो सर्वश्रुत आहे यानंतर आता विधानसभेच्या निवडणुका लागल्या केजचे माजी आमदार साठे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केजच्या तहसील कार्यालयात उपस्थित राहण्याऐवजी खासदार बजरंग सोनवणे परळीला हजर राहिल्याने शरद पवार गटातील गटबाजी पुन्हा एकदा जनतेसमोर आली आहे केज मतदार संघातील आडसकर समर्थकांचा एकच प्रश्न आहे रमेश आडसकरांची माजलगाव विधानसभा मतदारसंघातील उमेदवारी कोणी घालवली ? विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून शरद पवार गटातील बीड जिल्ह्यातील गटबाजी पुन्हा एकदा उफाळून बाहेर आल्याचे दिसत आहे
खासदार बजरंग सोनवणे व रमेश आडसकर यांच्यातील राजकीय विरोध जगजाहीर आहे त्यामुळे आडसकरांचा शरद पवार गटात प्रवेश होऊनही उमेदवारी न मिळाल्यामुळे आडसकर समर्थक खासदार बजरंग सोनवणे यांनाच यासाठी जबाबदार धरत आहेत हरिभाऊ सोळुंके यांची फेसबुक सोशल मीडियावर पोस्ट सध्या जोरात व्हायरल होत आहे दुसरीकडे केज विधानसभा मतदारसंघात माजी आमदार साठे यांना शरद पवार गटाची उमेदवारी मिळाली उमेदवारी दाखल करताना खासदार बजरंग सोनवणे उपस्थित राहतील अशी कार्यकर्त्यांना अपेक्षा होती मात्र खासदार बजरंग सोनवणे यांनी केज ऐवजी परळी येथे राजेसाहेब देशमुख यांची उमेदवारी दाखल करताना हजर राहिले यामुळे गेली अनेक वर्षापासून खासदार सोनवणे व माजी आमदार साठे एकाच पक्षात असले तरी त्यांच्यातील मतभेदाची अनेक वेळा चर्चा झाली पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांनी साठे निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून माजी आमदार साठे यांना केज विधानसभेची उमेदवारी दिली बहुतेक ही उमेदवारी खासदारांना आवडली नाही की काय अशीही चर्चा होत आहे त्यामुळे ते परळीला गेले असावे अशी चर्चा होताना दिसत आहे खासदारांच्या वतीने केज विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवार डॉ अंजली ताई घाडगे यांचे नाव खासदारांनी उमेदवारीसाठी पुढे केले असल्याचे समजते मात्र त्यांना तिकीट मिळाले नाही घाडगे यांनी तिकीट मिळाले तर लढणार अपक्ष निवडणूक लढवणार नाही अशी स्पष्ट भूमिका घेतली एवढेच नव्हे तर त्या स्वतः माजी आमदार साठे यांची उमेदवारी दाखल करताना हजर होत्या
परळी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांना शरद पवार गटाची उमेदवारी मिळाली खासदार सोनवणे व राजेसाहेब देशमुख यांच्यात फार सख्य आहे असेही नव्हे राजेसाहेब देशमुख रमेश आडसकरांचे व्याही आहेत त्यांचे व खासदार बजरंग सोनवणे यांचे सोबत किती सख्य आहे सर्वांनाच ठाऊक आहे मात्र जिल्ह्याचे खासदार आपण आहोत पक्षाने जिल्ह्यात उमेदवार देऊन आपण कुठेही उमेदवाराचे उमेदवारी अर्ज भरताना गेलो नाही तर चर्चा होईल या भीतीने खासदार बजरंग सोनवणे परळीला हजर राहिले मात्र केज विधानसभा मतदारसंघात पक्षाचा अधिकृत उमेदवार माजी आमदार साठे असताना विशेष म्हणजे केज हे खासदारांचे गाव आहे मात्र त्यांनी इथे हजर न राहता परळीला हजर राहिले यामुळे माजी आमदार साठे यांच्यासोबत चे राजकीय मतभेद कायम असल्याचे अधोरेखित झाल्याची चर्चा पुन्हा होत आहे विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटातील खासदार उमेदवार यांच्यातील गटबाजी उफाळून बाहेर आल्याने जिल्ह्यात हा चर्चेचा विषय बनला आहे