धनंजय मुंडे व माजी आमदार संजय भाऊ दौंड या दोन नेत्यात झाली दिलजमाई ?

.
अंबाजोगाई (प्रतिनिधी)-
परळी विधानसभा मतदारसंघातील आपल्या समर्थकांची बैठक घेऊन माजी आमदार संजय भाऊ दौंड यांनी संवाद बैठक आयोजित केली होती त्यानंतर वेगाने हालचाली होत महायुतीचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी संजय भाऊ दौंड यांची भेट घेतली चर्चा झाली त्या बैठकीचा तपशील देण्यासाठी आज दुपारी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्यात येणार आहे
परळी विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार कोण ? असा पेच अनेक दिवसापासून निर्माण झाला होता या मतदारसंघात अनेक नावे चर्चेत होती अंतिम टप्प्यात माजी आमदार संजय भाऊ दौंड यांचेही नाव चर्चेत आले संजय भाऊंनी आपल्या फार्म हाऊसवर संवाद बैठक बोलावली पवारांनी अचानक राजेसाहेब देशमुख यांची उमेदवारी जाहीर केली त्यानंतर धनंजय मुंडे यांनी रात्री उशिरा संजय भाऊ दौंड यांच्या फार्म हाऊस वर भेट घेऊन प्रदीर्घ चर्चा केली त्यानंतर आज दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद घेऊन मुंडे व दौंड आपली संयुक्त भूमिका मांडणार आहेत यावरून मुंडे व दौंड या दोन नेत्यात दिलजमाई झाली अशी चर्चा होत आहे आगामी निवडणुकीवर याचा किती परिणाम होतो पहावे लागेल