काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख पवारांच्या भेटीला पवार गटात प्रवेशाची शक्यता ?

सब टायटल: 
परळी विधानसभा मतदारसंघातून पवार गटाची कोणाला मिळणार उमेदवारी ?
Rajkiya

.

              अंबाजोगाई (प्रतिनिधी )-

परळी विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा उमेदवार कोण येणार शरद पवार कोणाला उमेदवारी देणार यावर बराच खल सुरू असून अंतिम टप्प्यात बीड जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख शरद पवारांच्या भेटीला गेले असून त्यांचाही प्रवेश होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे देशमुख यांना उमेदवारी मिळेल का ? अशीही चर्चा सुरू आहे 

           परळी विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढू इच्छिणाऱ्या सर्व इच्छुक उमेदवारांनी शरद पवारांची भेट घेऊन आमच्यापैकी कोणालाही उमेदवारी दिली तरी आम्ही सर्वजण त्यांचे काम करू असे आश्वस्त केल्यानंतर शरद पवार काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना दोन दिवसापूर्वी माजी आमदार संजय दौंड यांनी आपल्या समर्थकांना बोलावून संवाद साधला व पवार गटाची उमेदवारी मिळाली तर आपण निवडणूक लढण्यास तयार आहोत अशी ही चर्चा झाली मात्र अंतिम निर्णय दोन दिवसात घेऊ आता संजय देऊन काय निर्णय घेणार याकडेही परळी विधानसभा मतदारसंघातील जनतेचे लक्ष लागून आहे 

बीड जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघातील उमेदवार निश्चित झाल्यानंतर आता फक्त परळी विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीचा प्रश्न प्रलंबित आहे त्यामुळे शरद पवार कोणाला उमेदवारी देणार ?आज अचानक बीड जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख पवारांचे भेटीला गेले आहेत यावरून वेगवेगळे काय कयास लावले जात आहेत