केज विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार पृथ्वीराज साठे नशिबवान !

. अंबाजोगाई (प्रतिनिधी)-
केज विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीची उमेदवारी कोणाला मिळेल ? असा संभ्रम केज विधानसभा मतदारसंघातील मतदारांत निर्माण झाला होता मात्र राजकारणात निष्ठेला नक्की फळ मिळते असे अनेक वेळा म्हटले जाते पवारावरील निष्ठेचे फळ माजी आमदार पृथ्वीराज साठेंना मिळाले असून महाविकास आघाडीचे साठे उमेदवार बनल्याने ते नशीबवान ठरले विशेष म्हणजे केज मतदार संघाची पवारांनी मजबूत तटबंदी केल्याने साठे समर्थकांच्या आशा आता पल्लवीत झाल्याचे दिसत आहे
बीड जिल्ह्यात महाविकास आघाडीतील शरद पवार गटाने आष्टी मतदार संघातून राष्ट्रवादी युवाचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांना आघाडीची उमेदवारी देऊन शरद पवारांनी बीड जिल्ह्यातील मुस्लिम समाजाला न्याय दिल्याची भावना मुस्लिम समाजात निर्माण झाली आहे भाजपाचे आमदार सुरेश धस यांनीही शरद पवारांची भेट घेतल्याचे समजते गेवराई मतदार संघात शिवसेना ठाकरे गटाचे बदामराव पंडित यांना उमेदवारी मिळाली राष्ट्रवादी अजित पवार गटाची उमेदवारी अमरसिंह पंडित यांना मिळू शकते बीडमध्ये शरद पवार गटांची उमेदवारी कोणाला ? हे निश्चित झाल्यानंतर अजित पवार गटाची उमेदवारी जाहीर होऊ शकते असाही अंदाज बांधला जात आहे बीडमध्ये मुस्लिम समाजाला अजित पवार गट उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे भाजपाला बीड जिल्ह्यात केवळ केजच्या एका जागेवर समाधान मानावे लागले आहे बीड जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा ,राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सह भाजपाच्या स्टार प्रचारकांच्या सभा केज विधानसभा मतदारसंघात सर्वात जास्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे
माजी आमदार पृथ्वीराज साठे नशिबवानच !
केज विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार पृथ्वीराज साठे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटी नंतर साठेंनी शरद पवार गटात राहणे पसंत केले साठेची ही निष्ठेची भूमिका शरद पवार तसेच खासदार सुप्रिया सुळे यांना भावल्याचे समजते त्यामुळे पहिल्या दिवसापासून पवारांच्या मनात माजी आमदार पृथ्वीराज साठे हेच होते साठे यांची उमेदवारी अंतिम झाल्याचा पहिला फोन बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांनी साठे यांना सांगितले दुसरी महत्त्वाची घडामोड झाली ती बीडच्या ज्योतीताई मेटे यांचा शरद पवार गटात प्रवेश झाला आहे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचाही प्रवेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे दुधात साखर म्हणी प्रमाणे माजलगाव मतदार संघातील इच्छुक उमेदवार भाजपाचे रमेश आडसकर यांनी काल शरद पवार गटात जाहीर प्रवेश केला त्यांना माजलगाव मतदार संघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते साठे यांना केज मतदार संघात आडसकर गटाची मोलाची मदत निवडणुकीत मदत होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे तिसरा फॅक्टर अंबाजोगाई शहराचा माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी अजित पवार गटात असले तरी त्यांनीही माजी आमदार साठे यांचा उघड प्रचार करण्याचा मानस बोलून दाखवला असल्याचे समजते परळी विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवार माजी आमदार संजय भाऊ दौंड यांनी काल आपली भूमिका जाहीर केली त्यांचाही केज मतदार संघात माजी आमदार साठे यांना बऱ्यापैकी राजकीय फायदा होऊ शकतो या सर्व माजी आमदार तथा महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांना राजकीय फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे साठे यांना पवारांनी फक्त उमेदवारीचे तिकीट दिले नाही तर केज विधानसभा मतदारसंघांमध्ये सर्व बाजूने मदत होऊ शकेल अशी तटबंदी मजबूत केल्याची चर्चा होत आहे आता पाहू प्रत्यक्षात याचा किती फायदा मिळू शकतो