परळी विधानसभा मतदारसंघात तुतारीची उमेदवारी निष्ठावंताना द्यावी

.
मुंबई (प्रतिनिधी)-
परळी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार विद्यमान आमदार धनंजय मुंडे यांचा आगामी निवडणुकीत पराभव करायचा असेल तर माजी आमदार संजय भाऊ दौंड, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, ॲड माधव जाधव, प्रभाकर वाघमोडे, व्यंकटेश चामनर या निष्ठावंता पैकी कोणालाही उमेदवारी द्या मात्र आयाराम गयारामांना उमेदवारी देऊ नका अशी मागणी बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली शरद पवारांना आज भेटलेल्या शिष्टमंडळाने केली असल्याचे समजते
संभाव्य उमेदवाराच्या नावाची यादी सोशल मीडियावर किती फिरत असली तरी अद्याप शरद पवार गटाच्या कोणत्याही उमेदवाराची उमेदवारी अंतिम झाली नाही असेच सध्या तरी चित्र दिसत आहे बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे सोबतच माजी मंत्री पंडितराव दौंड बप्पा सुद्धा या शिष्ट मंडळा मध्ये होते भेटलेल्या शिष्टमंडळाने आमच्यापैकी कोणालाही उमेदवारी द्या आम्ही सर्वजण मिळून काम करू मात्र धनदांडगे, आयाराम, गयाराम यांना उमेदवारी देऊन आमच्यावर लादू नका अशी ही विनंती केल्याचे समजते शिष्टमंडळ भेटले तेव्हा यावेळी खासदार सुप्रिया सुळे सक्षणा सलगर यांचीही विशेष उपस्थिती दिसली आता परळी विधानसभा मतदारसंघातील उमेदवारी संदर्भात शरद पवार काय निर्णय घेतात याकडे या मतदारसंघातील इच्छुक उमेदवाराचे लक्ष लागून राहिले आहे