बीड जिल्ह्यातील एकही प्रश्न सोडवू न शकणाऱ्या खासदारांनी मुंदडा कुटुंबा कडील आमदारकीची काळजी करू नये - अक्षय मुंदडा

सब टायटल: 
पंकजाताई मुंडे यांचे नेतृत्व बळकट करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कामाला लागावे
Rajkiya

.

              अंबाजोगाई (प्रतिनिधी )- 

       बीड जिल्ह्याचे खासदारांनी खासदार झाल्यानंतर जिल्ह्यातील एखादा प्रश्न मार्गी लावला का ? नाही ना ! असे असताना धनेगावच्या जल पूजनानंतर मुंदडा कुटुंबाकडे आमदारकी जाऊ देणार नाही अशी वल्गना करणाऱ्या खासदारांच्या राजकारणाची सुरुवात मुंदडा घरापासून झाली हे तुम्ही विसरलात का ?असा खडा सवाल करत कोण काय म्हणते सोशल मीडियावर काय लिहिले जाते याकडे दुर्लक्ष करून येत्या 30 दिवस फक्त आपल्या नेत्या पंकजाताई मुंडे यांचे नेतृत्व सक्षम करण्यासाठी केज विधानसभा मतदारसंघाचा आमदार भाजपाचा झाला पाहिजे यासाठी मेहनत घ्या आमच्या कुटुंबाकडून काही चुका झाल्या असतील तर मोठ्या मनाने माफ करून आजच कामाला लागा अशी भावनिक साद भाजपाचे युवा नेते अक्षय मुंदडा यांनी अक्षय निवासावरील बोलावलेल्या मतदार संघातील प्रमुख कार्यकर्ते ,नेते ,मतदार यांना घातली 

       अक्षय मुंदडा पुढे बोलताना म्हणाले की आमच्या नेत्या पंकजाताई मुंडे व आमचे राजकारणा पलीकडे कौटुंबिक नाते आहे ते आजपर्यंत आम्ही जपले स्व डॉ विमलताई आजारी असताना अशा कठीण प्रसंगी पंकजाताईंनी दिलेली खंबीर साथ मुंदडा कुटुंब कधीही विसरू शकत नाही प्रमुख कार्यकर्त्यांनी आमदार नमिता मुंदडा यांनी किती कोटी रुपयांचा निधी आणला हे सांगितले मात्र मंत्रालय पातळीवर सुद्धा किती मेहनत करावी लागते न सांगितलेले बरे अनेकांनी कोरोना काळातील कामाची माहिती सांगितली. मतदार संघातील प्रत्येक मतदारासाठी मुंदडा कुटुंबाच्या घराची दारी 24 तास उघडे आहेत एका माजी आमदारांनी लोखंडी येथील रुग्णालयाच्या इमारतीचा उल्लेख केला त्याचा समाचार घेत भाजप युवा नेते अक्षय मुंदडा म्हणाले अनेक ठिकाणी कोरोना काळात मंगल कार्यालय भाड्याने घ्यावी लागली आपल्याकडे तशी वेळ आली नाही त्याला कारण लोखंडी येथील  त्यावेळी बांधलेली रुग्णालयाची भव्यमारत 

          बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे यांचा नामोल्लेख टाळत अक्षय मुंदडा म्हणाले आपला उमेदवारी अर्ज कधी भरायचा वरिष्ठ सांगतील त्यावेळी भरू विरोधाकाकडून उमेदवारी अजून निश्चित होत नाही दर दिवशी नवीन नाव समोर येत आहे खासदारांनी सर्वांनाच उमेदवारी देऊ असे कोपराला गुळ लावून रोज एका भावी आमदाराला घेऊन जात आहेत अवघा एक महिना शिल्लक आहे सोशल मीडियावर काय येते याकडे दुर्लक्ष करा आपला उद्देश येत्या 20 नोव्हेंबर रोजी आपला उमेदवारा साठी मताचा पाऊस पाडा अशी विनंती अक्षय मुंदडा यांनी आपल्या समर्थक कार्यकर्त्यांना केली