केज मध्ये आमदार नमिता ताई मुंदडांना निवडणुकीत विजय होण्यासाठी विकास तारेल ?

.
अंबाजोगाई (प्रतिनिधी )-
केज विधानसभा राखीव मतदार संघ आहे आरक्षणाची ही शेवटची टर्म असल्याने सर्व इच्छुक उमेदवार उमेदवारीसाठी अथक प्रयत्न करत आहेत भाजपाकडून विद्यमान आमदार नमिताताई मुंदडा यांच्याशिवाय पक्षाकडे कोणीही उमेदवारी मागितली नाही त्यामुळे आमदार नमिता मुंदडांची उमेदवारी अंतिम मानली जाते गेल्या 25 वर्षाच्या कार्यकाळात जेवढा विकास निधी केज मतदार संघात आला नाही तेवढा विकास निधी विद्यमान आमदार नमिताताई मुंदडा यांनी आपल्या दुसऱ्या टप्प्यातील दोन अडीच वर्षात आणला हा विकास आगामी विधानसभा निवडणुकीत मुंदडांना विजय होण्यासाठी तारेल का ? असाही सवाल केला जात आहे
केज विधानसभा मतदारसंघात आमदार नमिताताई मुंदडा यांना महाविकास आघाडीच्या वतीने प्रतिस्पर्धी उमेदवार कोण ?अशीही चर्चा केज विधानसभा मतदारसंघात होत आहे आज अचानक राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फे संभाव्य उमेदवाराची यादी न्यूज चैनल वर झळकत आहे त्यात संभाव्य उमेदवार म्हणून माजी आमदार पृथ्वीराज साठे यांचे नाव येत आहे मग इतर इच्छुक उमेदवारात माजी आमदार प्राध्यापक संगीताताई ठोंबरे, रमेश गालफाडे, अंजली घाडगे काय भूमिका घेणार असाही सवाल केला जात आहे माजी आमदार प्रा संगीता ताई ठोंबरे व डॉ अंजली घाडगे यांनी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचीही भेट घेतली होती जर आघाडीची उमेदवारी माजी आमदार साठेंना मिळाली तर इतर दोन्हीही महिला उमेदवार ठोंबरे व घाडगे एका इच्छुक उमेदवाराला जर उमेदवार द्यायचे ठरले तर जरांगे पाटील गटाकडून उमेदवारी मिळू शकते साठेंना आघाडीचे उमेदवारी मिळाली तर जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे केज मध्ये आपली ताकद लावतील ?खंबीरपणे साथ देतील का ?अशीही मतदारसंघातील कार्यकर्त्यातून दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे
भाजपाच्या विद्यमान आमदार नमिताताई मुंदडा यांनी न भूतो न भविष्यती एवढा विकास निधी आणला ही बाब खरी आहे ज्येष्ठ नेते नंदू शेठ मुंदडा रात्रंदिवस मतदार संघातील सर्वसामान्य जनतेच्या सेवेत असतात या सर्व जमेच्या बाजू असल्या तरी त्यांनाही यावेळी निवडणुकीत निवडून येण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल मतदार संघातील मुस्लिम मराठा तसेच दलित समाज भाजपाच्या कमळ या चिन्हावर मतदान करेल का ? असाही प्रश्न केला जात आहे लोकसभा निवडणुकीत पंकजाताईचा विरोध नव्हता मात्र या निवडणुकीत मोदी विरोधी लाट होती त्यामुळे पंकजाताईचा पराभव झाला आताही मोदी शहांच्या महाराष्ट्रात अनेक भागात जाहीर सभा होणार आहेत अल्पसंख्याक समाजाची मते भाजप उमेदवाराला मिळतील का ? विशेष म्हणजे मराठा योद्धा जरांगे पाटील यांची भूमिका अद्याप जाहीर होणे बाकी आहे यावर बरेच अवलंबून असल्याची चर्चा होत आहे बघू या भविष्यात निवडणुका कोणत्या दिशेने होतात ते