मराठवाडा दर्पणच्या पाठपुराव्याला तब्बल वर्षभरानंतर आले यश !

सब टायटल: 
अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयासाठी नवीन सिटीस्कॅन मशीनच्या खरेदीसाठी तब्बल 14 कोटी रुपयांचा निधी झाला मंजूर
Arogya Shikshan

.

             अंबाजोगाई (प्रतिनिधी)-  

अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयातील  सिटीस्कॅन मशीन बंद पडून चार ते पाच महिने झाले तरी याकडे कोणाचे लक्ष नव्हते मराठवाडा दर्पण न्यूज चॅनलच्या माध्यमातून सतत बातम्याच्या माध्यमाने आम्ही पाठपुरावा केला डीन कार्यालयाने या नवीन मशीनच्या खरेदीसाठी प्रस्तावही दिला होता मात्र नवीन मशीन खरेदीसाठी निधी मंजूर होत नव्हता अखेर नवीन सिटीस्कॅन मशीन खरेदीसाठी तब्बल 13 कोटी 96 लाख 44 हजार रुपयांचा निधी मंजूर होऊन एरबीस इंजीनियरिंग कंपनीला सदरील सिटीस्कॅन मशीन पुरवठा करण्याचे आदेश दिले  असल्याने वर्षभरानंतर मराठवाडा दर्पणच्या या प्रयत्नाला अभूतपूर्व यश आले आहे 

        अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयातील सिटीस्कॅन मशीन ला दहा वर्ष पेक्षा जास्त कालावधी झाल्याने ती मशीन कालबाह्य झाली होती त्यामुळे सतत बिघाड होऊन मशीन बंद पडली होती चार महिन्यापेक्षा जास्तीचा कालावधी बंद होऊन झाल्याने अनेक गोरगरीब रुग्णांची प्रचंड हेळसांड होत होती सिटीस्कॅन मशीन अभावी अनेक रुग्णावर उपचार न झाल्याने अनेकांनी या जगाचा निरोप घेतला गोरगरीब रुग्णाच्या सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी मराठवाडा दर्पणने यापूर्वी अनेक प्रश्नांसाठी पाठपुरावा केला त्याच पद्धतीचा पाठपुरावा सिटीस्कॅन मशीन साठी सर्वांच्या माध्यमातून प्रयत्न केला हा प्रश्न प्रकाशझोतात आणला होता प्रशासनाने नवीन सिटीस्कॅन मशीन खरेदीचा प्रस्ताव पाठवला होता तो प्रस्ताव अनेक वर्षापासून धूळ खात पडून होता गोरगरीब रुग्णाच्या जीवन मरणाच्या या प्रकलपाला निधी मंजुरी मिळणे किती आवश्यक आहे ही बाब मराठवाडा दर्पण न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्ही अनेक वेळा मांडले अखेर एक वर्षानंतर सदरच्या सिटीस्कॅन मशीनच्या खरेदीसाठी 14 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला विशेष म्हणजे सदरील मशीन खरेदीचे आदेशही पारित झाल्याने लवकरच नवीन सिटीस्कॅन मशीन अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयाच्या सेवेत दाखल होईल याचा फायदा बीड जिल्हाच नव्हे तर मराठवाड्यातील गोरगरीब रुग्णांसाठी होणार आहे एवढे मात्र नक्की