धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्रीताई मुंडे यांच्या गाडीचा अपघात

.
पुणे (प्रतिनिधी )-
पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील सोरतापवाडी फाटा ता. हवेली या फाट्यावर बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्रीताई मुंडे यांच्या कारला अपघात झाला आहे हा अपघात आज सकाळी पहाटे झाल्याची माहिती मिळत आहे
राष्ट्रीय महामार्गावरील फाट्याजवळील घुले पेट्रोल पंपा समोर अपघात घडला असल्याची माहिती मिळत आहे ही धडक एवढ्या मोठ्या जोराची होती की मुंडेंची कार राष्ट्रीय महामार्ग सोडून रस्त्याच्या बाहेर फेकली गेली सुदैवाने कार पलटी न झाल्यामुळे राजश्रीताई मुंडे व कारचालक सुखरूप आहेत घटनेनंतर राजश्री मुंडे एका खाजगी वाहनाने पुण्याच्या दिशेने रवाना झाल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले