पालकमंत्र्यांचा सत्कार करायला आचारसंहिता मग स्वतःच्या सत्कारासाठी आचारसंहिता लागून नाही का ?

सब टायटल: 
आदर्श आचारसंहिता लागू असताना अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात सत्काराचे आयोजन कसे केले ?
Rajkiya

.

             अंबाजोगाई ( प्रतिनिधी)-

अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीला दोन हेक्टर जमीन कृषी खात्याची देण्याचा निर्णय झाला अशी माहिती स्वतः मार्केट कमेटीचे चेअरमन राजेश्वर  चव्हाण यांनी दिली मात्र यासाठी मदत करणारे पालकमंत्री धनंजय मुंडे व माजी आमदार संजय दौंड यांचा सत्कार करायचा होता मात्र आचारसंहिता असल्यामुळे त्यांचा सत्कार केला नाही असे सांगत स्वतःचा सत्कार मार्केट कमेटीच्या सभागृहात करून घेतला त्यावेळी आदर्श आचारसंहिता सुरू असताना सभागृहात सत्कार केला कसा ?असाही सवाल आता सर्वसामान्य जनतेतून केला जात आहे 

       अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांना शेतीमालाची खरेदी विक्री करता यावी यासाठी मार्केट कमेटीने भूखंड काढले होते मात्र या भूखंडाचा श्रीखंडावरून बराच वाद झाला प्रकरण सध्या न्यायालयात असल्याचे समजते दुसरी बाब म्हणजे मार्केट कमेटीच्या परिसरातच काही गाळे आहेत ते गाळे परत मार्केट कमेटीला मिळाले त्या गाळे वाटपात  आर्थिक उलाढालीची बरीच चर्चा झाली तेही प्रकरण न्यायालयात असल्याचे समजते त्यामुळे नवीन आलेल्या संचालक मंडळाला कुठलीही भूखंड वाटपाची संधी मिळत नसल्याचे पाहून विधानसभेचा कालावधी संपण्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये अंबाजोगाई मार्केट कमेटीसाठी कृषी खात्याची दोन हेक्टर जमीन मार्केट कमेटीला नाममात्र किमतीवर मिळाली असल्याचे समजते या संदर्भात मार्केट कमेटीच्या सभापतींनी अंबाजोगाई शहरात डिजिटल बॅनर ही लावले होते 

             विधानसभेची आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर आज मार्केट कमेटीच्या सभागृहात विद्यमान सभापती राजेश्वर चव्हाण यांचा मार्केट कमेटीचे ज्येष्ठ संचालक दत्ता पाटील,विलास सोनवणे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष राजेभाऊ औताडे यांच्यासह अनेकांनी सभापतींचा दोन हेक्टर जमीन मिळाल्याबद्दल सत्कार केला यावेळी बोलताना सभापती राजेश्वर चव्हाण म्हणाले की बीड जिल्ह्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे व माजी आमदार संजय भाऊ दौंड यांच्या अथक परिश्रमामुळे ही जमीन मिळाल्याचे त्यांनी सांगितले मात्र सध्या विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता असल्यामुळे त्यांचा सत्कार सद्या  करता येत नाही अशीही माहिती सभापती यांनी पत्रकारांशी बोलताना दिली 

आचारसंहितेच्या काळामध्ये तुमचा सत्कार कसा ?

अंबाजोगाई मार्केट कमेटीचे सभापती राजेश्वर चव्हाण म्हणतात आचारसंहिता असल्यामुळे पालकमंत्री धनंजय मुंडे व माजी आमदार संजय भाऊ दौंड यांचा सत्कार करता येत नाही मग आदर्श आचारसंहिता सुरू असताना मार्केट कमेटीच्या सभागृहात तुमचा सत्कार कोणत्या आधारे झाला यावेळी आचारसंहिता लागू नव्हती का ? अशीही चर्चा आता सुरू झाली आहे बघूया सभापती तसेच ज्येष्ठ संचालक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष यासंदर्भात काय भूमिका घेतात 

         सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मार्केट कमिटीचे सचिव तसेच इतर कर्मचाऱ्यांनी सभागृहात सत्कार होताना सभापती व संचालकांना आदर्श आचारसंहितेची आठवण करून द्यायला हवी होती ती त्यांनी दिली नसल्यामुळे त्यांच्यावरही आदर्शाच्या संस्थेच्या काळात पदाधिकाऱ्यांचा शासकीय कार्यालयामध्ये सत्कार होणे आदर्श आचारसंहितेचा भंग असल्याचीही चर्चा होत आहे बघूया निवडणूक विभाग काय भूमिका घेते ते