विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना बीड जिल्ह्याचे खासदार सोनवणे अंडरग्राउंड का झाले ?

.
अंबाजोगाई (प्रतिनिधी )-
विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम सुरू झाला बीड जिल्ह्यातील सहाही जागेवर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार गटाला जागा सुटल्याची चर्चा होत आहे एकाही जागेवर उमेदवारांची अद्याप निश्चिती नाही जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे यांनी कोणत्याही मतदारसंघाचा उमेदवारी संदर्भात आढावा घेतल्याचे ऐकिवात नाही सध्या ते अंडरग्राउंड का झाले ? असा जनतेतून सवाल केला जात आहे जर सहाही जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाला सुटणार असतील तर जिल्ह्यात थोडी बहुत शिल्लक राहिलेल्या काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी काय करावे ?ठाकरे गटाच्या नेत्या सुषमाताई अंधारे यांनी तर थेट केजच्या जागेवर दावा केला होता त्याचे काय ? अशीही चर्चा होत आहे
बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर जिल्हाध्यक्ष आहेत मात्र जिल्हाध्यक्षाचे तिकीट अंतिम आहे की नाही निश्चित माहिती कोणाकडेही नसल्याचे समजते गेवराई विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या विद्यमान आमदाराने तुतारी हाती घेणार असल्याचा निश्चय केल्याचे समजते मात्र अद्याप त्यांनीही निर्णय घेतलेला दिसत नाही त्यामुळे गेवराई विधानसभा मतदारसंघात उमेदवार कोण ? हेही निश्चित नाही माजलगाव मतदार संघात तीच अवस्था अजितदादा पवार गटाचे आमदार प्रकाश दादा सोळुंके किंवा पुतण्या जयसिंग सोळुंके यांची उमेदवारी निश्चित मानली जात असली तरी त्यांचा प्रतिस्पर्धी उमेदवार कोण आजही निश्चित नाही रमेश आडसकरांच्या राजकीय भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे
परळी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष आहे मात्र तिथेही अद्याप कोणाचेही उमेदवारी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून निश्चित नसल्याचे समजते गुट्टे की फड ? अशी फक्त चर्चा आहे सर्वात महत्त्वाचे केज विधानसभा मतदारसंघ हा खासदार बजरंग सोनवणे यांचे होमपीच मानले जाते याही मतदारसंघातील दोन माजी आमदार सह अनेक इच्छुकांच्या कोपराला गुळ लावून ठेवल्याचे समजते उमेदवारी कोणाला मिळेल अद्यापही निश्चित नाही अशी सर्व विधानसभा मतदारसंघात उमेदवाराची उमेदवारी निश्चित नसल्याचे समजते
एकूण बीड जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीचा विचार केला तर जिल्ह्याला निवडून आलेले खासदार बजरंग सोनवणे यांनी जिल्ह्यातील सहापैकी एकाही मतदारसंघात उमेदवारी संदर्भात चाचपणी किंवा आढावा बैठक किंवा चिंतन मंथन केल्याची चर्चा ऐकवयास मिळत नाही यासंदर्भात राजकीय भाष्य करण्याऐवजी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या मतदारसंघात रस्त्यावर किती खोल खड्डे आहेत पंकजाताई कोयते घासून ठेवायला का सांगतात यावर खासदार टीकाटिपणी करण्यात व्यस्त आहेत मात्र जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करायचे ते सतत टाळत असल्याचे समजते सध्या ते अंडरग्राउंड का राहत आहेत असाही सवाल सर्वसामान्य जनतेतून केला जात आहे बघूया खासदार काय भूमिका घेतात ते