राष्ट्रीय महामार्ग व अंबाजोगाई शहरातील पथदिवे तात्काळ दुरुस्त करून सुरू करण्यात यावेत

.
अंबाजोगाई (प्रतिनिधी )-
अंबाजोगाई तालुक्याच्या हद्दीतील लोखंडी सावरगाव चौक ते यशवंतराव चव्हाण चौक ते संत भगवान बाबा चौकापासून शेपवाडी पर्यंतची राष्ट्रीय महामार्गावरील पथदिवे केज प्रमाणे तात्काळ सुरू करावे तसेच अंबाजोगाई शहरातील रस्त्याचे रुंदीकरण झाल्याने जुने छोटे बल्ब असल्याने त्याजागी नवीन मोठे मर्क्युरी बल्ब बसवून शहरातील मुख्य रस्त्यावर कोठेही अंधार राहणार नाही या संदर्भात केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिताताई मुंदडा यांनी दोन्ही कंत्राटदारांना सूचना केल्या आहेत याबाबतीत तातडीने कामालाही सुरुवात करत असल्याचे दोन्ही प्रशासनाने आमदारांना आश्र्वस्त केल्याचे समजते
आमदार नमिताताई मुंदडा यांच्याशी अंबाजोगाई शहरातील विविध विकासकामे तसेच राजकीय परिस्थितीवर चर्चा करताना यापूर्वी मराठवाडा दर्पण न्यूज चॅनलच्या माध्यमातून अंबाजोगाई शहरातील रस्त्याच्या रुंदीकरणामुळे रहदरीचा प्रश्न मिटला मात्र अंबाजोगाई नगरपरिषदेने शहरातील मुख्य रस्त्याच्या वरील खांबावर मेणबत्ती सारखे दिवे बसवले कुठे सुरू असतात तर अनेक ठिकाणी बंद असतात रस्ते रुंद झाल्याने पथदिव्याचा रस्त्यावर प्रकाश पडत नाही विशेष म्हणजे शासकीय रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सतत अंधार असल्याने पादचाऱ्यांना अनेक अडचणी निर्माण होत आहेत हीच अवस्था लोखंडी सावरगाव चौक ते यशवंतराव चव्हाण चौकापर्यंत तसेच संत भगवान बाबा चौकापासून शेपवाडी, रिंग रोडवर विद्युत खांब आहेत मात्र पथदिवे सुरू नसल्याने मुख्य रस्त्यावर अंधाराची परिस्थिती आहे सर्वसामान्य जनतेला याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे असा चर्चेदरम्यान मुद्दा उपस्थित करण्यात आला
आमदारांचा कंत्रालदाराला फोन
केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिताताई मुंदडा यांनी तातडीने नगर परिषदेच्या पथदिव्याची देखभाल दुरुस्तीचे काम करणाऱ्या कंत्राटदाराला फोन करून तातडीने अंबाजोगाई शहरातील सर्व मुख्य रस्त्यावरील पोलवर मोठे पथ दिवे बसवण्याच्या सूचना केल्या कंत्राटदाराने ती सूचनाही मान्य केली त्यानंतर राष्ट्रीय महामार्गाच्या कंत्राटदाराला फोन करून केजची लाईट तुम्ही सुरू केली त्याच पद्धतीने अंबाजोगाईचीही हायवेवरील पथदिवे तातडीने सुरू करा अशा आमदारानी सूचना केल्या मोरेवाडी, जोगाईवाडी, शेपवाडी या तीन गावच्या सरपंच व ग्रामसेवकांनी या संदर्भात संमतीपत्र दिले की लोखंडी सावरगाव च्या चौकापासून शेपवाडी पर्यंतच्या हायवे वरील पथदिवे सुरू होतील त्याची प्रक्रिया सध्या सुरू झाल्याचेही त्यांनी सांगितले आमदारांनी अंबाजोगाई शहर तसेच राष्ट्रीय महामार्गावरील पथदिव्याच्या प्रश्नाची सोडवणूक केल्याबद्दल जनतेतून आमदारांना धन्यवाद दिले जात आहेत