लमानाच्या सदरेवर मराठे मंत्री राबताना महाराष्ट्राने पाहिले , ब्राम्हण असलेल्या बाळासाहेब ठाकरे साठी मराठे आणि अठरा पगड जात जय महाराष्ट्र म्हणत सिद्ध झाली

Maharashtra

लमानाच्या सदरेवर मराठे मंत्री राबताना महाराष्ट्राने पाहिले , ब्राम्हण असलेल्या बाळासाहेब ठाकरे साठी मराठे आणि अठरा पगड जात जय महाराष्ट्र म्हणत सिद्ध झाली , ए आर अंतुले मुस्लीम मुख्यमंत्री , महाराष्ट्रात कुठल्याच क्षेत्रात जात हा निकष मापदंड नव्हता , मात्र अलीकडच्या २० वर्षात आपला नावाचा व्हायरस पुरोगामी महाराष्ट्रात संक्रमित आणि संसर्गित झाला तेव्हा , मग जातीचे नेते जातीच्या संघटना जातीचे मेळावे फुलले , राजकारणात मग जात कधी ढाल तर कधी शमशेर होऊ लागली . आज तर जातीचे मुकादम जातीचे समीकरणे सर्रास उघड सिद्ध होऊ लागले .  
     चला विषय आहे , महाराष्ट्र केसरी या ऐतिहासिक आणि महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या कुस्तीच्या फडाचा , हमालाचा पोरगा फडात उतरला आणि त्याला चुकीच्या निर्णयाने सेमीत हरवले जाते , सिकंदर शेख हा हरला नाही तर हरवला गेल्याची भावना सर्वच स्तरावरून व्यक्त झाली , चार गुण समोरच्या गड्याला बहाल केल्याचे कांबळे नामक पैलवान ने सातव नावाच्या पंचाला ठणकावून सांगितले व सिकंदर व अन्याय झाल्याचे म्हटले आहे .  जिथे टांग लागली तिथे २ गुण मिळायला हवे होते आणि सिकंदर ला एक गुण मिळायला हवा होता मात्र तिथे चार गुण दिले , पूर्ण पाटीवर पडलेले असेल तर ४ गुण मिळत असतात , मात्र सिकंदर चा पूर्ण कब्जा असताना देखील सिकंदर ला गुणदान झाले नाही .  कुस्तीच्या  फडाला केवळ मातीचा रंग होता आता मात्र तिथे देखील माणसांचे रंग पडत आहेत .  सिकंदर जिंकला असता तर महाराष्ट्राचा होता मात्र तो हरला आणि मुसलमान झाला , जर त्याच्यावर अन्याय झाला नसता तर कुणीही त्याची जात पुढे केली नसती मात्र २०१४ पासून देशात मुस्लीम असणे म्हणजे राष्ट्रीय व राष्ट्रवादी अपराध असल्यासारखे भासमान थेट सत्तेकडून होताना दिसते , बर खेळात जात नसते , मात्र देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषण संपवताना सब संतन कि पर्यंत ठीक आहे  मात्र सनातन धर्म कि म्हणणे कितपत योग्य आहे , देव देव्हाऱ्यात आणि अल्लाह मज्सीद मध्ये असावा आणि रोजचे वागणे अहो सत्तेचे वागणे तर केवळ आंबेडकर लिखित संविधान प्रमाणे असले पाहिजे , मात्र भाजपने हिंदुत्वाची जहागिरी आपल्या बापाच्या नावावर केल्या प्रमाणे जातील तिथे धर्माच्या घोषणा सुरु केल्या आहेत .  पेशव्यांनी नारायण मारला तो धरावे चे मारावे करून , सिकंदर ला देखील गुण देताना ध चा मा केल्याचे कुस्तीतल्या जाणकारांना वाटते .  माझ्यावर अन्याय झाला आहे की नाही हे सर्व महाराष्ट्राला माहित आहे. महाराष्ट्र हा शिवरायांचा आहे, सर्वांना इथं कुस्ती कळते. काल तुम्ही माझ्यासाठी रडून गेलाय पण एक दिवस मी तुम्हाला महाराष्ट्र केसरीची गदा जिंकून दाखवेल असे सिकंदर शेख ने म्हणणे आमचा महाराष्ट्र धर्म आहे .  
 खेळाडूची जात धर्म आता निकष होताना आम्हाला दिसतोय , मागे देखील बीडच्या जनेतेने राहुल आवारे यांचा प्रचंड कौतुक सोहळा केला , अगदी दोन आमदारात स्पर्धाच लागली ,कि कोण सत्कार करणार मात्र त्याच वेळी अंतराष्ट्रीय पातळीवरच्या अविनाश साबळे ने थेट अर्जुन मारले तरी त्याचे कौतुक करायला जिल्ह्याची माती तुलनेने सरसावली नाही .
 खेळात जात धर्म नसतोच मात्र अलीकडच्या काळात कोर्टा पासून ते खेळाच्या कोर्ट पर्यंत राजकीय हस्तक्षेप वाढल्याने दुही आणि धार्मिक रेषा गडद केल्या जात आहेत हे दाखवून देणारी लढत पवार निकाली निकाली निघाली आहे.