पाटोद्याचे रामकृष्ण बांगर, सत्यभामा बांगरसह 41 जनाविरुद्ध 13 कोटी पेक्षा जास्त रकमेच्या अपहारप्रकरणी गुन्हा दाखल

सब टायटल: 
बीडचे जिल्हा विशेष लेखापरीक्षक भोसले यांनी केली तक्रार दाखल
Crime

.

          अंबाजोगाई (प्रतिनिधी)- 

बीडचे जिल्हा निबंधक यांच्या आदेशानुसार जिल्हा विशेष लेखापरीक्षक भोसले यांनी पाटोदा येथील महात्मा फुले अर्बन कॉ ऑप बँक लि. चे तीन वर्षाचे लेखापरीक्षण केले असता कागदपत्र न घेता विविध संस्थांना वाटप केलेल्या 13 कोटी 21 लाख 60 हजार 25 रुपये एवढ्या रकमेचा अपहार व गैरव्यवहार झाल्याचा अहवाल जिल्हा निबंधकांना दिल्यानंतर जिल्हा निबंधकाच्या निर्देशानुसार लेखापरीक्षक भोसले यांनी पाटोदा पोलीस ठाण्यात या अपहार प्रकरणी रीतसर तक्रार दाखल केल्यानंतर तब्बल 41 आरोपीविरुद्ध पाटोदा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे 

                  वरील गुन्ह्यातील आरोपीमध्ये संदीप सानप, बाळू पवार ,भाऊसाहेब सोनसळे, तुकाराम बावणे, भगवान शिंदे, श्रीरंग सानप, श्रावण बांगर, संजय सगळे, संभाजी मस्कर, भगवान पाखरे, भगवान सोनवणे राजेंद्र गवळी, नवनाथ नागरगोजे पांडुरंग मस्के, रुक्मिणी बांगर, रफिक पठाण, सीताबाई जावळे रामकृष्ण मारुती बांगर बाळासाहेब राख, रणजीत चौरे, सुरेश पुराणिक, प्रदीप दत्तात्रय कुलकर्णी, भीमराव सानप, दिनकर बांगर, शामराव कंठाळे (मयत ),विष्णू थोरवे, महादेव बांगर, राजाभाऊ बावणे, बाळासाहेब बांगर ,लक्ष्मण शिंदे नवनाथ नागरगोजे , बाबासाहेब नागरगोजे, हनुमंत भोसले, प्रभाकर गीते ,प्रदीप गिरे ,रवींद्र उगले, जनार्धन कंठाळे, गुलान भाई मेंगडे ,रामचंद्र रांजवण, संजय सानप, सत्यभामा रामकृष्ण बांगर आदींचा समावेश आहे 

                तक्रारीमध्ये ज्या 14 संस्थाचा जिल्हा विशेष लेखापरीक्षकांनी उल्लेख केला आहे त्यात प्रगती जिनिंग चुंबळी, चंद्रभागा दूध संस्था, ज्योतिर्लिंग दूध संस्था ,सिताराम बाबा दूध संस्था, सुशिक्षित बेकार दूध संस्था ,महात्मा फुले दूध संस्था ,नवनाथ दूध संस्था, श्रीकृष्ण दूध संस्था, जय किसान दूध संस्था ,जागृती दूध संस्था, सावित्रीबाई फुले दूध संस्था, भगवान बाबा ट्रेडर्स ,पाटोदा तालुका दूध सहकारी संघ आदी संस्थांचा यात समावेश असल्याचे लेखा परीक्षकांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे वरील रकमेच्या अपहरप्रकरणी पाटोदा पोलिसांनी एकूण 41 आरोपी विरुद्ध कलम 420, 406, 409 ,467 ,468 ,471, 34 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे