रुग्णालयातील सुरक्षारक्षक डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी की रुग्णाच्या नातेवाईकांना मारहाण करण्यासाठी ?


.
अंबाजोगाई (प्रतिनिधी)-
अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी महिन्याला लाखो रुपयांचा पगार देऊन अधिष्ठाता कार्यालय यांनी सुरक्षारक्षक नेमले आहेत मात्र सुरक्षारक्षकांची रुग्णाच्या नातेवाईकांशी उद्धट वागणूक मारहाण करणे आता तर एक पाऊल पुढे टाकत प्रसूती कक्षाकडे जाणाऱ्या सुगाव येथील पती-पत्नीला सुरक्षारक्षकांनी धक्काबुक्की करून जमिनीवर पाडले यात रियाज पटेल यांच्या हाताला दुखापत झाली असून त्यांनी रीतसर डीन यांच्याकडे तक्रार दिली आहे डीन यांनी चौकशी करून कार्यवाही करावी अन्यथा डीन कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे
प्रसूती कक्षा समोर आज घडलेल्या घटनेची तक्रार सुगाव गावचे रियाज पटेल यांनी डीन यांना दिली आहे तक्रारीत ते म्हणतात आज सकाळी प्रसूती कक्षात रुग्ण असल्याने त्याच्या मदतीला माझ्या पत्नीला सोडण्यासाठी मी गेलो असता सुरक्षारक्षक सुरज ढोले यांनी आम्हा दोघा पती पत्नीला अडवले मी त्यांना सांगितले सीझरचा पेशंट आहे पत्नीला माहिती नाही फक्त त्यांना सोडून परत येतो अशी विनंती करता सुरक्षा रक्षकाने अर्वाच भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली मला व माझ्या पत्नीला जोरात धक्का देऊन जमिनीवर पाडले त्यामुळे मी व माझी पत्नी दोघेही खाली पडलो माझ्या हाताला जबर जखम झाल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले असून सकाळी आठ ते साडेआठ वाजण्याच्या दरम्यान बी बिल्डिंगच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये ही घटना चित्रित झाली असेल ती तपासले तर सत्य समोर येईल
डीन साहेबांनी माझ्या तक्रारीची शहानिशा करून सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना पहावी सुरक्षारक्षक सुरज ढोलेवर कायदेशीर कार्यवाही करण्याची त्यांनी मागणी करत सदरील निवेदन सुरक्षारक्षक पुरवठा करणाऱ्या मुंबईच्या संस्थेलाही पाठवले आहे यापूर्वी अनेक घटना रुग्णालयात घडल्याने रुग्णालयातील सुरक्षारक्षक डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी आहेत की रुग्णाच्या नातेवाईकांना मारहाण करण्यासाठी ? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडत आहे आता बघू डीन कार्यालय या घटनेची चौकशी करून काय कार्यवाही करते की नाही