केज विधानसभेच्या मैदानात फक्त मुंदडा व साठेच होते

सब टायटल: 
गेली पावणे पाच वर्ष इच्छुक उमेदवार कुठे होतात तुम्ही ?
Rajkiya

.

         अंबाजोगाई (प्रतिनिधी )- 

विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लागणार म्हणताच अचानक अनेक इच्छुक उमेदवार मैदानात उतरले याची भेट घे त्याची भेट घे यावर तुम्ही निवडून येणार आहात का ? केज मतदार संघात फक्त मुंदडा व साठे आजी-माजी आमदार पावणे पाच वर्ष दिसत होते आतापर्यंत इच्छुक उमेदवार तुम्ही कुठे होतात ? असा सवाल मतदारसंघातील मतदार करत आहेत 

             राजकीय परिस्थितीचा विचार केला तर अजून राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री कॅबिनेट मंत्री यांचे तिकीट कन्फर्म आहे की नाही कोणी चर्चा करत नाही मात्र केज मध्येच मात्र उमेदवाराची  उमेदवारी जाहीर करण्याची माध्यमांना सुद्धा का घाई होऊ लागली सर्वसामान्य नागरिकांना या संदर्भात कळेना झाले मतदारसंघात विकास निधी किती आला याची बेरीज करायची म्हटले तर विद्यमान आमदार मोजदाद करावी लागते अशा भाजप उमेदवारासमोर जनतेसमोर बोलायला इच्छुक उमेदवाराकडे मुद्दा तर पाहिजे की नको किमान माजी आमदार साठे यांनी पडत्या काळात शरद पवारांना सोडले नाही अधून मधून मतदारसंघातील विविध प्रश्नांवर निवेदन देणे सुरू होते मात्र अचानक उगवलेले इच्छुक कोणीही पावणे पाच वर्षात जनतेच्या प्रश्नावर संघर्ष सोडा साधे सुखदुःखात चमकले नाहीत त्यांना आमदार झाल्यासारखे वाटू लागले आहे दररोज वेगवेगळ्या पक्ष नेतृत्वाला भेटणारे आपल्या ठेवणीतील व्यक्तीच्या माध्यमातून दररोज आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत यालाच तुमचा विकास म्हणायचा का ? असाही सवाल सर्वसामान्य जनतेतून या इच्छुक उमेदवारांना विचारला जात आहे