योगेश्वरी देवल कमेटीने विद्यमान आमदाराबद्दल मनाचा मोठेपणा दाखवायला हवा !

सब टायटल: 
आमदार नमिताताई मुंदडा यांच्या हस्ते उद्या होणार पाच कोटीच्या कामाचे भूमिपूजन
Rajkiya

.

                 अंबाजोगाई (प्रतिनिधी )- 

श्री योगेश्वरी देवल मंदिर परिसरात भाविकांच्या साठी मूलभूत सुविधा निर्माण करणे तसेच सुशोभीकरणाच्या कामासाठी भाजपाच्या आमदार नमिताताई मुंदडा यांनी योगेश्वरी मंदिर परिसरातील विकास कामासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला त्या कामाचे भूमिपूजन आमदारांच्या हस्ते उद्या दिनांक 6 ऑक्टोबर रविवार सायंकाळी पाच वाजता मंदिर परिसरात होणार आहे 

          योगेश्वरी देवल कमेटीचे पदसिद्ध अध्यक्ष तहसीलदार विलास तरंगे आहेत मात्र उपाध्यक्ष ,सचिव ,कोषाध्यक्ष सह सर्व देवल कमेटीचे सदस्य राजकीय दृष्ट्या आमदार मुंदडा विरोधी गटाचे मानले जातात सुरुवातीला दोन कोटी रुपयांच्या निधी मंजुरीच्या श्रेयावरून बराच वाद झाला होता त्यावेळी योगेश्वरी देवल कमेटीच्या सचिवापासून सर्वांनीच पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांसमोर आपली बाजू मांडली होती 

         विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागू होऊ शकते आमदार नमिताताई मुंदडा यांनी भूमिपूजनाचा कार्यक्रम उद्या ठेवला असल्याची माहिती त्यांनी सोशल मीडियावर टाकली आहे या कार्यक्रमासंदर्भात योगेश्वरी देवल कमेटीचे सचिव प्राध्यापक अशोक लोमटेना विचारणा केली असता आपणास या कार्यक्रमाची कल्पना नसल्याचे ते म्हणाले आमदारांनी पाच कोटी रुपयांचा निधी आणला तुम्ही योगेश्वरी देवल कमेटीच्या वतीने आमदार नमिता ताई मुंदडाचे आभार मानणार का ?असा प्रश्न केला असता सचिव अशोक लोमटे म्हणाले इतरांशी राजकीय त्यांचे मतभेद असतील मी तर मूळ भाजपचा आहे मला तरी किमान या कार्यक्रमाची कल्पना दिली असती तर आमदाराचे नक्की स्वागत केले असते असेही अशोक लोमटे म्हणाले मंदिर परिसरातील विकास कामासाठी निधी आणला तर आम्ही नक्की स्वागत करू आमदारांनी देवल कमेटीला अशा सार्वजनिक कार्यक्रमाची कल्पना द्यायला हवी होती असेही अशोक लोमटे म्हणाले 

मध्यस्थी करण्यासाठी तहसीलदार कमी पडले का ?

      श्री योगेश्वरी देवल कमेटीचे पदसिद्ध अध्यक्ष हे विद्यमान तहसीलदार विलास तरंगे आहेत इतर राजकीय वादाच्या वेळी सोडा मात्र किमान योगेश्वरी देवल मंदिर परिसरातील विकास कामासाठी आमदारांनी निधी आणला आणि त्या कामाचे भूमिपूजन होणार असेल तर अशावेळी अध्यक्ष म्हणून ते कमेटीतील सदस्य व पदाधिकारी यांना विश्वासात घेऊन मध्यस्थी करू शकले असते त्यांनी मध्यस्थी केली का नाही माहित नाही त्यांच्याशी यासंदर्भात माहिती घेण्यासाठी फोनही केला मात्र त्यांनी फोन उचलला नाही त्यामुळे नक्की भूमिका काय ? या संदर्भात कळू शकले नाही मात्र योगेश्वरी देवल कमेटीचे अध्यक्ष म्हणून अशा विकास कामाच्या वेळी आमदार व कमेटी यांचा समन्वय घडवायला हवा होता अशीही चर्चा भाविकातून ऐकवास मिळत आहे