डीन डॉ धपाटे साहेब रुग्णालयातील घटनेवर पडदा टाकणे म्हणजे मोठ्या घटनेला निमंत्रण देत आहात

.
अंबाजोगाई (प्रतिनिधी)-
पश्चिम बंगालमधील शासकीय रुग्णालयातील घटनेने देशभराचे लक्ष वेधले गेले तरीही इतर ठिकाणच्या शासकीय रुग्णालयातील प्रशासन अशा घटनेला गांभीर्याने अजून घ्यायला का तयार नाही हेच समजत नाही अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात मागील महिन्याभराच्या काळात अनेक घटना गंभीर स्वरूपाच्या घडूनही रुग्णालय प्रशासनाने अशा घटनेची म्हणावी तशी गंभीर दखल घेतली नाही असेच दिसते डीन डॉ धपाटे साहेब रुग्णालयातील घटनेवर पडदा टाकणे म्हणजे मोठ्या घटनेला निमंत्रण देणे असेच म्हणावे लागेल कर्मचारी कंत्राटी असो की कायमस्वरूपी त्यांनी केलेल्या गुन्ह्याची शिक्षा का दिली जात नाही ? असाही सवाल जनतेतून रुग्णालय प्रशासनाला केला जात आहे
अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यावर नियंत्रण ठेवणारा सक्षम कोणीही अधिकारी नसल्याने त्यांच्यावर कोणाचाही अंकुश नसल्याचे समजते या रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णासोबत पुरुष नातेवाईक असतातच असे नव्हे अनेक वेळा माहिती नसल्याने महिला नातेवाईक रुग्णालयातील कर्मचारी म्हणून विश्वास ठेवून अनेक बाबीची विचारणा करतात त्या महिला नातेवाईकांच्या मजबुरीचा गैरफायदा उचलत अनेक गैरप्रकार होत असल्याच्या घटना रुग्णालय परिसरात घडत आहेत एका महिला नातेवाईकाने स्वतःवर गुदरलेल्या प्रसंगाची लेखी तक्रार डीन यांच्याकडे दिली असल्याचे समजते मात्र कारवाई काय तर वार्ड बदलला अशा कर्मचाऱ्यांना वार्डा ऐवजी रुग्णालय परिसराच्या सफाईचे काम का लावले जात नाही ? असाही सवाल केला जात आहे
काही दिवसानंतर प्रसुती कक्षाच्या लेबर रूमच्या व्हरांड्यात अशीच एक घटना घडल्याचे समजते त्या महिलेने ड्युटीवर असणाऱ्या सुरक्षारक्षकाला या घटनेची माहिती दिली त्या कर्मचाऱ्यांना सुरक्षा रक्षकानी योग्य तो चोप दिला त्या कर्मचाऱ्यावर काय कारवाई झाली एवढी गंभीर घटना घडते विशेष म्हणजे ही घटना रुग्णालयाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्याचेही समजते तरीही म्हणावी तशी कठोर कारवाई रुग्णालय प्रशासन त्या कर्मचाऱ्यावर केली का जात नाही याच छोट्या घटना एखाद्या गंभीर घटनेला जन्म देऊ शकतात त्यामुळे प्रशासनाने कठोर पावले उचलणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे जनतेतून बोलले जाते बघू डीन अशा घटनांची गंभीर दखल घेतात की नाही