भाजपाला केज विधानसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी चाचपणी करण्याची पाळी का आली ?

सब टायटल: 
खा अजित गोपछडे उद्या शासकीय विश्राम गृहावर भाजप कार्यकर्त्यांशी साधणार संवाद
Rajkiya

.

         अंबाजोगाई (प्रतिनिधी )-

     बीड जिल्ह्यात भाजपाचे दोन विद्यमान आमदार आहेत त्यापैकी केज विधानसभा मतदारसंघाचे आमदार नमिताताई मुंदडा आहेत भाजपकडे इतर कोणीही इच्छुक उमेदवाराने उमेदवारी मागितली असे ऐकिवात नाही विशेष म्हणजे पहिल्या 50 उमेदवारा  मध्ये उमेदवारी मुंदडाची उमेदवारी जाहीर झाल्यात जमा अशी चर्चा मतदारसंघात होत असताना अचानक खा अजित गोपछडे यांना भाजप पक्षाने निरीक्षक म्हणूनअंबाजोगाईला  पाठवले असल्याचे समजते सोशल मीडियावर पंकजाताई मुंडे समर्थकांनी पोस्ट टाकून या संदर्भात माहिती दिली आहे 

           खा अजित गोपछडे काही दिवसापूर्वी अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात आले होते त्यांनी रुग्णालयातील समस्या जाणून घेऊन पत्रकार परिषद घेतली होती त्यावेळी त्यांनी बोलताना अनेक वेळा उल्लेख केला होता मला या ठिकाणी बोलावले नाही मी आलो आहे असे ते का म्हणाले त्यांच्या उद्याच्या दौऱ्यामुळे त्यावेळी ते बोलले अशी चर्चा होत आहे बीड लोकसभेचा निकाल लागल्यापासून पंकजाताई मुंडे समर्थकांच्या सोशल मीडियावर सतत पोस्ट पडत होत्या मात्र याकडे कोणीही फारसे गंभीरपणे पाहिले नसल्याने मुंडे समर्थक अधिक आक्रमक झाल्याची चर्चा होत आहे दररोज नवीन पर्याय हवा आहे अशा पोस्ट पडू लागल्या मात्र भाजपकडे कोणत्याही इच्छुक उमेदवाराने उमेदवारी मागितली नसल्याने पक्षांतर्गत वाद शमेल विद्यमान आमदार नमिताताई मुंदडा यांची उमेदवारी पहिल्या यादीत नाव असेल असा अंदाज मुंदडा समर्थक बांधत असताना अचानक उद्या खा अजित गोपछडे यांना भाजपने निरीक्षक म्हणून पाठवल्याने ते उद्या अंबाजोगाईत येत असल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळत आहे अधिकृत कोणीही माहिती दिली नाही मात्र भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी या वृत्तास दुजोरा दिला असून पक्षाची रुटीन पद्धत असल्याचे त्यांनी सांगितले 

    मुंदडा यांची तारेवरची कसरत 

                   केज विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान भाजप आमदार नमिताताई मुंदडा यांनी विकास निधी एवढा आणला की आज पावेतो कोणीही आणू शकला नाही मात्र बीड लोकसभा निवडणुकीनंतर भाजपातील पंकजाताई मुंडे समर्थकांच्या प्रखर विरोधाचा त्यांना सामना करावा लागत आहे निरीक्षक त्यामुळेच येणार असावेत निरीक्षक कार्यकर्त्याची समजूत काढू शकतील का? कधी नव्हे ते यावेळी विधानसभा निवडणुकीसाठी अनेक सशक्त इच्छुक उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत मुंदडा यांची मुस्लिम, दलित ,मराठा समाजाच्या मतावर मदार असली तरी वंजारा समाजाची मतेच विजय कोणत्याही उमेदवाराला मिळवून देतात त्यामुळे वंजारा समाजातील प्रमुख कार्यकर्त्यांचा असलेला प्रखर विरोध मुंदडा कुटुंब कसे कमी करू शकते हे पाहावे लागेल गेली 25 वर्षाचा राजकारणाचा अनुभव असणारे मुंदडा पिता पुत्राची भूमिका यामध्ये महत्त्वाची असेल एवढे मात्र नक्की