मुंदडा यांच्या वर आरोप होत असताना पुढे न येणारे कार्यकर्ते काँग्रेस पक्षाचा काय मुकाबला करणार ?


.
अंबाजोगाई (प्रतिनिधी )-
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने भाजप देशातील आरक्षण संपवणार अशा पद्धतीचे नॅरेटिव्ह सेट केल्यामुळे भाजप च्या जागा कमी झाल्या यामुळे भाजपने दलित मतदार आपल्या बाजूने कायम राहावा यासाठी प्रमुख कार्यकर्त्यांना भाजपमध्ये समावेश करण्याचे निर्देश दिले त्या दृष्टीने आंबेजोगाई शहरातील अनेक कार्यकर्त्यांना भाजपमध्ये मुंदडा यांच्या माध्यमातून प्रवेश दिला बीड जिल्ह्यात काँग्रेस पक्ष विधानसभा निवडणुकीत कुठेच सक्रिय,आक्रमक नसल्याने काँग्रेस विरोधी प्रचार कुठे करणार ? असाही प्रश्न भाजप मध्ये प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना पडू शकतो
गेले काही दिवसापासून मुंदडा कुटुंबावर अनेक गंभीर आरोप होत आहेत अशावेळी कार्यकर्त्यांनी नेत्याच्या पाठीशी उभे राहावे असे कोणत्याही नेत्याला अपेक्षित असते स्थानिक पातळीवर भाजपचा विचार केला तर अनेक प्रमुख कार्यकर्ते भाजप मध्ये प्रवेश केलेले तसेच यापूर्वी गेल्या अनेक वर्षापासून मुंदडा कुटुंबाशी रात्रंदिवस सावली सारखे सोबत असणारे अनेक प्रमुख कार्यकर्ते आहेत यापैकी कोणीही मुंदडा यांच्यावर आरोप होत असताना समोर आले नाही मग विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला कसा विरोध करणार ? अशी चर्चा होत आहे अलीकडे राजकारणात पक्ष कोणताही असो नेत्यासोबत असणारे कार्यकर्ते नेत्यासाठी किती कवच बनू शकतात हे अनेक वेळा समोर आले आहे त्यामुळे नेते सुद्धा कार्यकर्त्याकडून फार अपेक्षा करत नाहीत अशा खोगीर भरतीचे काय ? असाही सवाल केला जात आहे