बीड जिल्ह्याचे खा बजरंग सोनवणे यांना पत्रकाराची एवढी ॲलर्जी का ?

सब टायटल: 
माजी आ साठे सह इच्छुक उमेदवारांना संधी असताना फायदा घेता आला नाही
Rajkiya

.

        अंबाजोगाई (प्रतिनिधी ) - 

बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे हे केज तालुक्यातील धनेगाव येथील धरण पाण्याने शंभर टक्के भरल्यामुळे जल पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता मात्र यावेळी पत्रकारांना निमंत्रित न केल्यामुळे खासदारांना एवढ्या लवकर पत्रकारांची एलर्जी आली का ? असा प्रश्न उपस्थित होतआहे दुसरीकडे माजी आमदार पृथ्वीराज साठे यांच्यासह अनेक जण केज विधानसभा मतदारसंघात तुतारीच्या चिन्हावर निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत या इच्छुक उमेदवारांना पत्रकारांशी संवाद साधून समन्वय करण्याची संधी होती मात्र अनेक इच्छुक उमेदवार खासदाराच्या सोबत जल पूजनाला आले असले तरी त्यांना माध्यम प्रतिनिधीशी समन्वय करण्याची आवश्यकता वाटली नाही असेच दिसते 

             विशेष म्हणजे काल केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिताताई मुंदडा यांच्या हस्ते जल पूजनाचा कार्यक्रम झाला यावेळी त्यांनी केज ,अंबाजोगाई शहरातील माध्यम प्रतिनिधींना निमंत्रित करून समन्वय साधण्याचा प्रयत्न केला दुसरीकडे आज खासदार बजरंग सोनवणे यांनीही जल पूजनाचा कार्यक्रम आयोजित केला खासदार झाल्यानंतर त्यांचा हा पहिला कार्यक्रम आहे या कार्यक्रमाला अंबाजोगाईच्या माध्यम क्षेत्रातील एकाही प्रतिनिधींना या कार्यक्रमाला निमंत्रित केले नसल्याचे समजते त्याचे कारण जिल्ह्याचे खासदार असो आमदार असो किंवा इच्छुक उमेदवार असो प्रत्येकानी सोबत एक प्रतिनिधी नियुक्त केला असून जाहीर कार्यक्रम असो किंवा वैयक्तिक भेटी असो या कार्यक्रमाच्या बातम्या व फोटो सोशल मीडियावर त्यांच्यामार्फत टाकल्या जातात विशेष म्हणजे अलीकडे प्रेस नोट पत्रकारिता सक्रिय झाल्याने अशा कार्यक्रमाच्या बातम्याही छापून येतात त्यामुळे राजकीय नेत्यांनी माध्यम प्रतिनिधीला सार्वजनिक कार्यक्रमाला बोलवण्याचे जवळपास टाळत असल्याचे दिसते 

             सध्या विधानसभेच्या निवडणुकीचे वारे सुरू आहे केज विधानसभा मतदारसंघांमध्ये अनेकांना आमदारकीचे स्वप्न पडत आहेत सर्व इच्छुक उमेदवार सर्वच राजकीय नेत्यांच्या मागेपुढे फिरत आहेत विशेष म्हणजे सर्व पक्षाकडे उमेदवारीसाठी ते आपल्या उमेदवारीची मागणी करतात व्यासपीठ शेअर करतात आता या इच्छुक उमेदवारांना नेमके  कोणता पक्ष उमेदवारी देणार ? हे अद्याप निश्चित नसले तरी केज विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार साठे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने प्रबळ दावेदार मानले जातात त्यांना माध्यम प्रतिनिधीशी समन्वय करण्याची ही संधी होती मात्र त्यांनीही माध्यम प्रतिनिधीकडे पाठ फिरवली असेच दिसते. दुसरे विशेष म्हणजे केजच्या इच्छुक उमेदवार डॉ अंजली ताई घाडगे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये प्रवेश केलाय त्याही खासदाराच्या प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थिती लावत आहेत तिसरे इच्छुक उमेदवार रमेश गालफाडे, काल शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे यांच्या व्यासपीठावर होते ते आज खासदारांच्या कार्यक्रमाला उपस्थित होते त्यामुळे या मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचा उमेदवार कोण होणार खासदारांनी किती जणाच्या कोपराला गुळ लावले ? हेच कळायला मार्ग नाही