खासदार बजरंग सोनवणे व आमदार लक्ष्मण पवार यांनी मुख्यमंत्र्यांना कार्यवाही करण्याचे लेखी पत्र दिले

.
अंबाजोगाई (प्रतिनिधी )-
मुस्लिम समाजाचे प्रेषित मोहम्मद पैगंबर साहब यांच्या विषयी बेताल वक्तव्य करणाऱ्या रामगिरी महाराजावर कायदेशीर कार्यवाही करावी असे लेखी पत्र मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे व गेवराई विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण पवार यांनी दिले मग बीड, केज, माजलगाव, परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार मुख्यमंत्र्यांना अशा मागणीचे लेखी पत्र देणार का ? असाही सवाल मुस्लिम समाजाकडून आमदारांना केला जात आहे
बीड लोकसभा निवडणुकीचा विचार केला तर या निवडणुकीत मुस्लिम समाजाची मते निर्णायक ठरली नव्हे खासदार बजरंग सोनवणे यांनी स्वतःच याची जाहीर सभेतून कबुली दिली यामुळे अशावेळी त्यांनी ठोस भूमिका घेणे अपेक्षित होते त्यांनी ती घेतली विधानसभा निवडणुकीचा आता कार्यक्रम लागणार आहे बीड जिल्ह्यात गेवराई, बीड, केज, माजलगाव ,परळी या विधानसभा मतदारसंघात सुद्धा मुस्लिम मते निर्णायक संख्येत आहेत त्यामुळे की काय कोण जाणे सर्वात प्रथम गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लेखी पत्र देऊन रामगिरी महाराजांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केल्याचे पत्र समाज माध्यमावर व्हायरल केले आहे
इतर आमदारांची भूमिका काय ?
बीड ,केज ,माजलगाव ,परळी विधानसभा मतदारसंघात सुद्धा मुस्लिम समाजाची मते निर्णायक भूमिकेत आहेत चारही विधानसभा मतदारसंघातील आमदारांनी आज पावेतो मुख्यमंत्र्याकडे लेखी पत्र देऊन रामगिरी महाराजांवर कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी का केली नाही चारही आमदार लेखी पत्र देणार आहेत की नाही यासंदर्भात कोणीही स्पष्ट भूमिका जाहीरपणे मांडलेली नाही राणे हे सुद्धा सतत मुस्लिम समाजाविषयी वादग्रस्त वक्तव्य करत आहेत या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित दादा पवार गटाचे आमदार चव्हाण यांनी यासंदर्भात लेखी तक्रार दिली मात्र राज्याचे गृहमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या तक्रारीच्या चौकशीचे आदेश देण्याऐवजी राणे याचे अप्रत्यक्ष त्या वक्तव्याचे समर्थन केले असल्यामुळे मुस्लिम समाजात प्रचंड नाराजी पसरली आहे आगामी विधानसभा निवडणुकीत याचा फटका भाजप उमेदवारांना बसू शकतो अशीही चर्चा होत आहे