माजी खासदार डॉ प्रीतम ताई मुंडे यांनी विधानसभेची निवडणूक लढवावी - मागणी

.
अंबाजोगाई (प्रतिनिधी )-
बीड लोकसभेत पंकजाताई मुंडेंचा पराभव झाल्यानंतर त्यांना भाजपने विधान परिषदेवर संधी दिली मात्र माजी खासदार डॉ प्रीतम ताई मुंडे यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढवावी अशी मागणी मुंडे समर्थकांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून केली जात असल्याने आता प्रीतम ताई मुंडे काय भूमिका घेतात याकडे मुंडे समर्थकाचे लक्ष लागून राहिले आहे
माजी खासदार डॉ प्रीतम ताई यांनी माजलगाव विधानसभा, गंगाखेड विधानसभा ,पाथर्डी विधानसभा, आष्टी विधानसभा अशा विविध मतदार संघाचा संदर्भ देत या मतदारसंघातून प्रीतम ताईनी उभे राहावे तुमचा विजय निश्चित असल्याचा विश्वास मुंडे समर्थक त्यांना देत आहेत आता माजी खासदार डॉ प्रीतम ताई मुंडे काय भूमिका घेतात याकडे मुंडे समर्थकांचे कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे
भाजपाचा बीड जिल्ह्यात नेता कोण ?
देशात व राज्यात सत्तेत मुख्य भूमिकेत असणाऱ्या भाजपा पक्षाची बीड जिल्ह्यात पंकजाताई मुंडे यांच्या पराभवानंतर अत्यंत दुरावस्था झाल्याचे चित्र दिसत आहे भाजपाचा बीड जिल्ह्यात नेता कोण ?असा प्रश्न केला तर प्रत्येकाला डोके खाजवावे लागते तरीही नाव सापडत नाही अशी सध्या तरी अवस्था भाजपाची बीड जिल्ह्यात झाल्याचे चित्र दिसत आहे पंकजाताई कडे पुणे जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघाची पक्षाने जबाबदारी दिल्याने आता बीड जिल्ह्यात भाजपाचा नेता कोण ? कोणालाही सध्या तरी नाव सुचत नाही ही अवस्था देशात व राज्यात सत्ताधारी पक्ष असणाऱ्या भाजप पक्षाची झाली आहे बीड जिल्ह्यात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत प्रत्येक जण विचारतो शरद पवार गटाचे तिकीट कोणाला ?यावरून विधानसभा मतदारसंघांमध्ये कोणाचे पारडे जड ? तो अंदाज वर्तवला जाऊ शकतो ही अवस्था आहे बीड जिल्ह्यातील राजकीय पक्षाची !