सह्याद्रीचे मावळे ग्रुपच्या वतीने अनाथ आश्रमात केले अन्नदान



.
पिंपरी चिंचवड /अंबाजोगाई (प्रतिनिधी )-
गणेश उत्सव निमित्त सह्याद्रीचे मावळे हा ग्रुप सतत विविध समाज उपयोगी उपक्रम राबवत असतो यावर्षी होप हाऊस या अनाथ आश्रमातील मुलासोबत संवाद साधत या अनाथाश्रमातील मुलांना अन्नदान करण्यात आले दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राबवणाऱ्या सह्याद्रीचे मावळे ग्रुपचे जनतेतून कौतुक होत आहे
यावेळी ग्रुपच्या सर्व सदस्यांनी अनाथालयातील मुलासोबत संवाद साधत गणेशोत्सव सण साजरा केला यावेळी सह्याद्री मावळे ग्रुपचे रोहित जाधव ,अरविंद मेश्राम, नवनाथ पवार, सुरज भोसले, निखिल कोचे, पवन कापुरे, अजय देवकाते ,पंकज गजभिये, आकाश वानखेडे, अक्षय फाजगे, किरण पाटोळे, शंकर कुंभार ,आशुतोष लांडगे तसेच दलित महिला सुरक्षा संघटनेचे अध्यक्ष सौ सुरेखाताई पाखरे, रुकसार शेख, ज्योती कांबळे आदि मान्यवर सदस्य यावेळी उपस्थित होते शेवटी या कार्यक्रमाची सांगता झाली
डीन साहेब गरिबो की सुनो उपरवाला तुम्हारी सुनेगा !
अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन पदी डॉ शंकर धपाटे यांनी पदभार घेतल्यानंतर काय बदल होईल ? असा काहींना प्रश्न पडायचा मात्र डीनच्या खुर्चीवर बसताच शंकररावानी आपला तिसरा डोळा उघडताच अनेकांची भंबेरी उडाली तेच म्हणू लागले ऐसा भी हो सकता है ?
सोनोग्राफी विभागामध्ये दररोज रुग्णांची गर्दी होत आहे आजही तीच अवस्था आहे डॉक्टर सुट्टीवर तर गेले नाहीत ना असा प्रश्न रुग्णांना पडत आहे ही अवस्था दररोजची झाली आहे सहाजिक आहे तीस ते चाळीस सोनोग्राफी दररोज होतात इतरांना पुन्हा दुसऱ्या दिवशी यावे लागते रुग्ण संख्या पाहता आणखीन एकास सोनोग्राफी मशीनची उपलब्धता झाली तर रुग्णाचा प्रश्न कायमचा शोधू शकतो हीच अवस्था सिटीस्कॅन ची सुद्धा झाली नवीन मशीन येईल तेव्हा येईल मात्र जुन्या मशीनवरच सध्या तरी काम भागवले जाते ती कधी बंद पडेल काही सांगता येत नाही ती बंद पडली तर पुन्हा खाजगी सिटीस्कॅन वाल्याची चांदी झाली समजायचे असे होऊ नये म्हणजे झाले रुग्णांची मागणी आहे की दररोज सोनोग्राफी विभागातील डॉक्टर वेळेवर हजर राहिले तर वेळेवर सोनोग्राफी होईल त्यामुळे रुग्णांना पुन्हा दुसऱ्या दिवशी येण्याची गरज पडणार नाही त्यामुळे डीन यांनी यात लक्ष घालून तशी रुग्णांची व्यवस्था करावी अशी मागणी होत आहे