पालकमंत्री मुंडे यांच्या हस्ते सुधीर चाटे यांना दिले नियुक्ती पत्र

सब टायटल: 
राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे अंबाजोगाई तालुका अध्यक्षपदी निवड
Rajkiya

.

           अंबाजोगाई (प्रतिनिधी)-  

वरवटी गाव विधानसभा केज विधानसभा मतदार संघात येते या गावचे सरपंच, सोसायटीचे चेअरमन असलेले सुधीर ज्ञानोबा चाटे यांना जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट तालुका युवक अध्यक्षपदी नियुक्तीचे पत्र आज देण्यात आले 

      वरवटी गाव पूर्वी भाजपच्या विचारसरणीला मानणारे गाव होते कालांतराने हे गाव केज विधानसभा मतदारसंघात गेल्यानंतर परळीच्या भाजप नेतृत्वाचे या गावाच्या भाजप कार्यकर्त्याकडे म्हणावे तसे लक्ष राहिले नाही भाजप समर्थक असणारे स्वर्गीय अनंत चाटे यांचे सुधीर चाटे हे नातू आहेत राजकीय नेतृत्वाचे दुर्लक्ष होत असलेल्या गावातील भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी अनेक वेळा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याशी चर्चा झाली चर्चेअंती सर्व सहकाऱ्यांच्या समतीने गावचे सरपंच, चेअरमन असलेले सुधीर चाटे यांना संधी देण्याचे ठरले 

            त्यानुसार आज मुंबईला वाल्मीक अण्णा कराड, शिवाजीराव शिरसाठ, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट तालुकाध्यक्ष राजेभाऊ औताडे सरचिटणीस रंजीत चाचा लोमटे मार्केट कमेटीचे संचालक सत्यजित शिरसाठ, बाळू शेठ बजाज आदी सर्वजण सुधीर चाटे यांना घेऊन मुंबई येथे गेले पालकमंत्र्यांच्या हस्ते अंबाजोगाई तालुका युवकचे अध्यक्षपदी निवडीचे पत्र देऊन निवडीबद्दल पालकमंत्री यांनी चाटे यांचा सत्कार केला चाटे यांच्या निवडीबद्दल त्यांचेवर तालुकाभरातून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे