स्मशानभूमी व क्रीडा संकुलाच्या मैदानावर चालतो रात्रीचा खेळ

सब टायटल: 
नगर परिषद प्रशासन व पोलिसांना घ्यावी लागणार आहे याची संयुक्त दखल
Krida Manoranjan

.

         अंबाजोगाई (प्रतिनिधी)- 

अप्पर पोलीस अधीक्षक व अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाठीमागील शासकीय जमिनीत अंबाजोगाईचे तालुका क्रीडा कार्यालय, क्रीडा संकुल व त्यालगत स्मशानभूमीवर  तब्बल प्रत्येकी एक ते दीड कोटी रुपये खर्च करून भव्य असे बांधकाम झाले आहे मात्र या दोन्ही जागेत रात्रीचा खेळ चालतो ही बाब सर्वांनाच ठाऊक असूनही कोणीही आज पावतो पुढे येत नव्हते स्मशानभूमी संदर्भात आज सीओ यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे दोन्ही ठिकाणचा रात्रीचा खेळ बंद करायचा असेल तर नगरपरिषद प्रशासन व पोलिसांनी संयुक्त भूमिका घेतली तरच हा प्रश्न सुटू शकतो अशी चर्चा होत आहे 

       अंबाजोगाई भव्य असे क्रीडा संकुल व्हावे ही जनतेची इच्छा होती त्यामुळे यावर करोडो रुपयाचा निधी खर्च झाला मात्र तब्बल पाच वर्षापेक्षा जास्त कालावधी उलटून गेला कार्यालयाचे साधे कुलूप सुद्धा उघडले गेले नाही दोन वेळा इमारतीची डागडुजी झाली क्रीडा मैदानावर दर  पावसाळ्यात पावसाचे पाणी आल्यामुळे तलावाचे स्वरूप येते मात्र मैदानाच्या बाजूला असलेल्या प्रेक्षकांसाठी बनवलेल्या पायऱ्यावर रात्रीचे सात वाजल्यापासून ते बारा ते एक वाजेपर्यंत प्रचंड या ठिकाणी अंधारात गर्दी असते ती बाब सर्वांनाच ठाऊक आहे कारण पायऱ्याखाली बाटल्यांचा खच सकाळी पहावास मिळतो क्रीडा संकुलावर पथदिवे सोडा साधी मेणबत्ती लागत नाही त्यामुळे अंधारात सबकुछ चलता है एक बार आकर तो देखो असेही डायलॉग मारले जात आहेत 

          या बाजूलाच भव्य अशा स्मशानभूमीचे बांधकाम झाले आहे यासाठी माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनी आपले राजकीय वजन वापरून निधी आणला बांधकाम झाले कंत्राटदार कोण आहे कोणाला ठाऊक नाही साठे यांच्या सोबत याच भागात राहणारे पत्रकार जगन सरवदेसह अनेक सहकार्यांचा आग्रह होता त्यामुळे माजी आमदार साठे यांनी एक ते सव्वा कोटी रुपये खर्च करून निधी आणून सदरील स्मशानभूमीचे बांधकाम पूर्ण केले सरवदे यांच्या म्हणण्यानुसार अनेक वेळा साठे साहेबांच्या कानावर हि बाब घातली मात्र त्यांनी डोळे झाक केली त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष गोविंद मस्के यांनी नगरपरिषदेच्या वतीने सीओ यांना निवेदन देऊन सदरील स्मशान भूमीतील जागेचा गैर मार्गाने वापर होत आहे स्मशानभूमीचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराकडून नगरपरिषदेने ताबा घेण्याची विनंती केली आहे आता नगर परिषदेच्या सीओ काय भूमिका घेतात याकडे जनतेचे लक्ष लागून आहे गैरवापर बंद करायचा असेल तर नगरपरिषद प्रशासन व पोलिसांनी संयुक्त कार्यवाही करावी लागेल त्याशिवाय हा प्रकार बंद होणार नाही अशी चर्चा जनतेतून ऐकवास मिळत आहे