नेकनुरची जनता उतरली रस्त्यावर रस्ता केला जाम निर्णयाचा केला विरोध



.
नेकनूर (प्रतिनिधी )-
बीड महसूल मंडळातील काही गावे अंबाजोगाईच्या बांधकाम खात्याच्या विभागीय कार्यालयाला जोडू नये यासाठी नेकनुरची जनता रस्त्यावर उतरली रस्ता जाम केला निर्णयाचा तीव्र विरोध करत घोषणाबाजी केली बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे यांनी आंदोलनकर्त्यांना आश्वासित करत वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन योग्य तो निर्णय घ्यायला लावू तुम्ही घाबरण्याची गरज नाही मी आहे ना तुमच्या पाठीशी ! असे आश्वासन दिले असल्याचे समजते
बीड तालुका महसूल मंडळातील काही गावे अंबाजोगाईच्या बांधकाम खात्याच्या विभागीय कार्यालयाला जोडू नये या एकमेव मागणीसाठी आज सकाळी साडेदहा वाजता नेकनुर येथे रास्ता रोको करण्यात आला यावेळी शिवाजीराव शिंदे, सय्यद खालेद, तुळजीराम शिंदे, महादेव मुळे, मकसुद पैलवान यांची आंदोलनकर्त्यासमोर भाषणे झाली लालू जागीरदार, विलास राऊत ,मुकुंद काळे ,सय्यद नदीम मंडोला ,सय्यद रिजवान सय्यद तोफिक बबलू युवा नेते शकील भैया फाजेल बागा, दत्ता सावंत ,हरी सावंत ,विष्णू मेंगडे, सय्यद रौफ, लादेन पाशा, संजय लांडगे ,विजय इंगळे ,शौकत शेख ,दीपक निर्मळ, केशव मुळे, सागर शिंदे ,स्वप्निल शिंदे आदी यावेळी प्रमुख भूमिकेत होते रास्ता रोको आंदोलनकर्त्याचे निवेदन मंडळ अधिकारी नाईकवाडे व पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी यांनी स्वीकारले