पिंपरी चिंचवड मध्ये कलाकारांच्या हितासाठी कलाकारांची बैठक पार पडली

.
पिंपरी चिंचवड येथे शिवाजी पार्क संभाजी नगर मध्ये हर्षधन विला मध्ये कलाकारांची बैठक पार पडली या मेळाव्यामध्ये कलाकारांच्या हिताचे मुद्दे, महिला कलाकारांच्या सुरक्षिततेचे आणि त्यांच्या उपजीविकेच्या प्रश्नावर चर्चा झाली
कलाकारांच्या जीवनातील प्रश्न आणि त्यांच्या जिवनयापन प्रश्न या सारख्या गहन मुद्यावर चर्चा झाली
आणि येथून सर्व कलाकारांना या प्रश्न सोडवण्यासाठी एकत्रित होण्यासाठी आवाहन करण्यात आले.
बैठकीचा उद्देश्य सर्व कलाकारांना एकत्र येवून आपले प्रश्न सोडवणे आणि कलाकारांना योग्य तो हक्क मिळावा हा होता लवकरच कलाकारने कलाकारांसाठी एक स्वतंत्र व्यासपीठ सुरु करणार असून त्या व्यासपीठामधून कलाकारांचे अनेक प्रश्न सोडविल्या जाणार आहे व विविध योजना राबविल्या जाणार असून कलाकारांना काम व कामाचा योग्य मोबदला देण्याचं काम हे व्यासपीठ करणार आहे अशी माहिती मंगेश सिरसाट, बलराम पवार यांनी यावेळी दिले कलाकारांना योग्य मानधन कामाचे तास व सिरीयलचे 3 महिन्याने मिळणार मानधन या वर सुद्धा चर्चा करण्यात आली.
यावेळी बैठकीमध्ये मान्यवर कलाकार मंगेश शिरसाठ, बलराम पवार, सचिन राठोड, अपूर्व बागुल, किरण गायकवाड, प्रकाश इंगवले , जितेंद्र नलावडे, गजानन कांबळे, महेंद्र भांगे तसेच मान्यवर महिला कलाकार अर्पिता खंडू शिवणेकर , सारिका शिवणेकर उपस्थित राहून कलाकारांच्या प्रश्नावर हितगुज साधला.