या नराधमांना झाले तरी काय ? विद्यार्थीनीचा शिक्षकाने केला विनयभंग

सब टायटल: 
परळी शहरातील बिलाल शाळेतील प्रकार आला समोर गुन्हा दाखल
Crime

.

           अंबाजोगाई (प्रतिनिधी)- 

दर दिवशी कुठे ना कुठे अशा अप्रिय घटना घडू लागल्या आहेत या नराधामाना झाले तरी काय ?असा प्रश्न सभ्य समाजाला पडत आहे परळी शहरातील बिलाल प्राथमिक उर्दू शाळेतील एका बारा वर्षीय विद्यार्थिनीचा त्याच शाळेतील शिक्षकाने विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला त्या शिक्षकाविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे 

            परळी शहरातील बारा वर्षाच्या मुलीसोबत त्याच शाळेतील शिक्षकाने अश्लील चाळे केले त्या मुलीने घरी गेल्यानंतर आपल्या वडिलांना घडलेला किस्सा सांगितला वडिलांच्या फिर्यादीवरून पोलिसात त्या शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला अटक सुटका होईल मात्र--- हा सर्व प्रकार पाहून समाज कुठवर शांत बसणार आहे शिक्षकी पेशात असणाऱ्या अशा प्रवृत्तीला वेळीच धडा शिकवला गेला पाहिजे अशीही चर्चा आता सुरू झाली आहे त्या शाळेच्या संस्थाचालकांनी संबंधित शिक्षकांची शाळेतून सुट्टी करायला हवी आहे अशी कृत्य करणाऱ्या शिक्षकांना अद्दल घडवली तरच भविष्यात असे कुकृत्य करताना कोणीही दहा वेळा विचार करेल घटना परळी शहरात घडली असली तरी जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्राला तर काळीमा फासली गेलीच शिक्षकी पेशा समाजात आदर्श मानला जातो त्यालाही तडा गेला आहे त्यामुळे समाजातून अशा प्रवृत्ती विरोधी सर्वांनी एकत्र येऊन ही प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे अशा प्रतिक्रिया जिल्ह्यातून व्यक्त होत आहे