मेडिकल रोडवर विद्युत खांबावर मेणबत्ती ऐवजी पथदिवे बसवण्याची मागणी

सब टायटल: 
तत्कालीन सीओ यांनी जाता जाता विद्युत विभागाला दिला नवा कंत्राटदार
Sampadkiya

.

          अंबाजोगाई (प्रतिनिधी)-  

     अंबाजोगाई नगर परिषदेच्या मार्फत शहरातील मुख्य रस्त्यावरील स्ट्रीट लाईट, पाणीपुरवठा, पाईपलाईन दुरुस्ती, स्वच्छता अशा महत्त्वाच्या कामासाठी नगरपरिषद प्रशासनाने कंत्राटदार नियुक्त केले आहेत तत्कालीन सीओ यांनी जाता जाता धाडसी निर्णय घेत पंधरा-वीस वर्षापासून नगरपरिषदेच्या सत्तेत सत्तेचा उपभोग घेणाऱ्या पुढार्‍याच्या लाडक्या गुत्तेदाराचे कंत्राट रद्द करून आपल्या मर्जीतील कंत्राटदाराला विद्युत विभागाचे कंत्राट दिल्याचे समजते मेडिकल रोडवर संध्याकाळी अंधार पडत आहे बाहेर गावच्या अनेक महिलांना माहिती नसल्यामुळे त्या शहरात पायी ये जा करतात विद्युत खांबावर असणाऱ्या दिवे मेणबत्त्यासारखा प्रकाश देत असल्याने रस्त्यावर सर्वत्र अंधार पडत आहे त्यासाठी या खांबावर कंत्राटदाराने पथदिवे बसवावेत अशी मागणी होत आहे 

                  नगरपरिषद प्रत्येक कंत्राटदाराला प्रति महिना ठरल्याप्रमाणे लाखो रुपयांची बिले अदा करते मात्र एक बाब प्रत्येक विभागासंदर्भात सारखी पाहावयास मिळते ती म्हणजे कंत्राटदार नेमलेला असला तरी नगर परिषदेचे प्रमुख कर्मचारी त्या कंत्राटदार व नगरपरिषद दोघांच्या वतीने प्रमुख भूमिका पार पाडत असतात या संदर्भात नगर परिषदेच्या प्रशासनाने गांभीर्याने विचार करून कंत्राटदाराला प्रत्यक्षात काम करण्यास भाग पाडावे अशीही मागणी होत आहे 

      तत्कालीन सिओ  सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधीचे बाजूने प्रशासकीय निर्णय करतात असा त्यांच्यावर सतत आरोप व्हायचा मात्र जेव्हा त्यांची बदली झाली त्यांनी जाता जाता ज्यांनी त्यांच्यावर पक्षपातीपणाचे आरोप केले त्या नेत्याच्या जवळील अनेक कंत्राटदाराचे करोडो रुपयाचे बिले काढल्याने त्यांच्या बदलीला स्थगिती मिळावी यासाठी शिफारस दिली गेली नसल्याचे समजते तत्कालीन सिओ यांनी दुसरा धाडसी निर्णय घेतला तो म्हणजे विद्युत विभागाचे कामकाज करण्यासाठी कंत्राटदार नसल्याने नवीन कंत्राटदार देण्याचा निर्णय घेतला कारण यापूर्वीच्या कंत्राटदाराच्या विरुद्ध थेट विधानसभेच्या सभागृहात तारांकित प्रश्न झाले होते त्यामुळे त्या कंत्राटदाराचे कंत्राट सीओ यांच्या आदेशाने संपुष्टात आणले गेले होते नवीन कंत्राटदार नेमण्याची कुठेही चर्चा झाली नाही मात्र तत्कालीन सीओ बदलून गेल्यानंतर विद्युत विभागाचे काम करण्यासाठी नियुक्त झालेले कंत्राटदार अवतरले त्यांनी गेल्या ऑगस्ट महिन्यापासून कामकाजाला सुरुवात केल्याचे समजते विशेष म्हणजे विद्युत विभागाला नवीन कंत्राटदार आल्याचे अंबाजोगाई शहरातील एका तरी माजी नगरसेवकाला माहिती आहे का ? असाही खोचक प्रश्न नगरपरिषदेतील परिसरात केला जात आहे आजही विद्युत विभागाचे प्रमुख असलेला बंडू विद्युत विभागाची सर्व जबाबदारी प्रशासनाची असो किंवा कंत्राटदाराची असो पार पाडत आहे लागणारे साहित्य तोच आणतो बसवण्याची जबाबदारी त्याच्याकडेच आहे मग कंत्राटदार नेमला कशासाठी ? असा प्रश्न निर्माण होत आहे मेडिकल रस्ता हा अत्यंत संवेदनशील रस्ता बनला आहे प्रत्येकजण चार चाकी दुचाकीने प्रवास करतात असे नाही अनेक वेळा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णाचे नातेवाईक महिला विविध तपासणीसाठी अथवा इतर कामासाठी शहरात येताना पायी येतात हा रस्ता पूर्णपणे अंधारमय रस्ता झाल्याने एखादी अप्रिय घटना घडल्यानंतरच नगरपरिषद प्रशासन या विद्युत खांबावर मोठे पथदिवे बसणार आहे का ? असाही सवाल केला जात आहे