मांडवा येथे पथ नाट्यातून सादर केली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची जन जागृती



.
तालुक्यातील मांडवा येथे सकाळी एक पथ नाट्याने जन जागृती अभियान अंतर्गत सादरीकरण केले व मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची जागृती करत महिलांना या योजनेचे महत्त्व पटवून दिले
सध्या महायुती सरकारने केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे जनजागृती अभियान बीड जिल्ह्यामध्ये जोरात सुरू आहे.
अंबाजोगाई तालुका व परळी तालुक्यातील अनेक गावांमध्ये हे पथक गावोगावी जाऊन मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची बीड जिल्हा प्रशासना कडून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. यात विविध महाराजाकडून गावो गावी कीर्तनाच्या माध्यमातून विविध ठिकाणी व ग्रामीण भागात बॅनर लावण्यात आले आहे. व एलईडी व्हॅन मधून व्हिडिओ द्वारे या योजनेची जनजागृती करण्यात येत आहे.
पथनाट्याद्वारे जनजागृती नागरिकांना आकर्षित करत आहे यामुळे गावातील चावडीवर पथनाट्याच्या बाजूला नागरिक एकत्र होऊन या योजनेचे महत्त्व जाणून घेत आहेत यामध्ये महिला मध्ये कमालीची उत्सुकता दिसून येत आहे