अंबाजोगाई तालुका खरेदी विक्री संघावर अशासकीय अध्यक्ष व सदस्यांची नियुक्ती ?

.
अंबाजोगाई (प्रतिनिधी)-
अंबाजोगाई तालुका खरेदी विक्री संघाच्या संचालक मंडळाची मुदत संपल्याने शासनाने या संघावर प्रशासक नेमला आहे मात्र या संघावर अशासकीय संचालक मंडळ नेमावे अशी शिफारस बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली असून अद्याप या अशासकीय संचालक मंडळाचे नियुक्तीचे पत्र सहकार खात्याकडून जारी झाले नसल्याचे समजते
पालकमंत्र्यांनी शिफारस केलेल्या सदस्यामध्ये एकाही धनगर समाजातील सदस्याचा समावेश नाही अशी खंत धनगर समाजाचे नेते दत्ता वाकसे यांनी व्यक्त करत पालकमंत्र्यांच्या शिफारशीचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल केले आहे पालकमंत्र्यांनी शिफारस केल्यानुसार गुलाबराव गंगणे (दैठना)(अध्यक्ष ) सदस्या मध्ये हाश्मी फताउल्ला (सायगाव) मनोज गंगणे(राडी) काशिनाथ यादव (तळेगाव घाट) सचिन शिंदे (सुगाव) बालाप्रसाद बजाज (बर्दापूर) बापूराव गीते (तळणी) बबन मुंडे (मुरकुटवाडी) विकास कदम (अंबाजोगाई ) गणेश कराड (अंबाजोगाई) ज्ञानोबा औताडे (सेलु अंबा) व्यंकट आपेट (गिरवली) प्रदीप चव्हाण (हातोला) भागवत निकम (पोखरी) चंद्रकांत वाकडे (पट्टीवडगाव) हरिश्चंद्र भारती (उजनी) सौ आशा संजय भाऊ दौंड आदींचा या अशासकीय संचालक मंडळावर सदस्य म्हणून शिफारशीत उल्लेख असल्याचे दिसते आता ही निवड कधी जाहीर केली जाते याची उत्सुकता परळी विधानसभा मतदारसंघातील सर्वांनाच लागली आहे