पवार गटाची उमेदवारी घ्यायची तर देशमुखांना जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागेल

.
अंबाजोगाई (प्रतिनिधी)-
बीड जिल्हा काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांना परळी विधानसभेची निवडणूक लढवायची आहे काँग्रेस पक्षाकडून नव्हे तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून त्यांना लढवायची आहे त्यांनी शरद पवारांची भेट घेतली मात्र ते शरद पवार आहेत पहिल्या पदाचे राजीनामा देऊन प्रवेश केल्याशिवाय ते उमेदवारी देत नाहीत त्यामुळे राजेसाहेब देशमुख यांना अगोदर काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागेल असे दिसते जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे यांना पत्रकारांनी जिल्ह्यातील विविध विधानसभा मतदारसंघातील उमेदवारा संदर्भात विचारणा केली असता ते म्हणतात अद्याप कोणाचेही नाव निश्चित नाही
परळी विधानसभा मतदारसंघातून अनेक दिग्गज उमेदवार इच्छुक आहेत विशेष म्हणजे बीड जिल्ह्यात तुतारीची उमेदवारी मिळविण्यासाठी सर्वच इच्छुक उमेदवार इच्छुक आहेत अशीच अवस्था केज मध्ये सुद्धा निर्माण झाली आहे बजरंग सोनवणे यांना सुद्धा खासदारकीच्या निवडणुकीच्या वेळी उमेदवारी देण्या अगोदर राजीनामा देऊन शरद पवार गटात प्रवेश करावा लागला होता आता विधानसभेसाठी इच्छुक पैकी माजी आमदार पृथ्वीराज साठे व डॉ अंजली घाडगे दोघांनी मनाचा मोठेपणा दाखवत दोघांनीही दोघांच्या बॅनरवर एकमेकांचे फोटो टाकले आहेत पक्ष ज्याला उमेदवारी देईल त्याचा इतरांनी प्रचार करायचा एवढा राजकारणात पहिल्यांदाच समजूतदारपणा पहावयास मिळत आहे केज मध्ये आज डॉ अंजली घाडगे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन खासदारांच्या पत्नी सारिकाताई सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जिल्ह्यात जिल्हाध्यक्षा संजीवनी देशमुख सह महिला पदाधिकारी हजर होत्या उमेदवारी केज मतदार संघातून कोणाला मिळते यावर बरेच अवलंबून आहे एक मात्र गोष्ट नक्की की केज विधानसभा असो की परळी विधानसभा निवडणुकीत इच्छुक उमेदवारांनी गेली पाच वर्षात कधीही सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी एकही इच्छुक उमेदवाराने आंदोलन सोडा साधे निवेदन ही दिले नाही मग आज तुम्हाला केज व परळी विधानसभा मतदारसंघातील जनतेने निवडून का द्यावे ? असाही सवाल जनतेतून केला जात आहे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून राजेसाहेब देशमुख यांनी अधून मधून अनेक वेळा जिल्ह्यात आंदोलने केली इतर इच्छुक उमेदवाराचे कार्य काय ? असाही सवाल जनतेतून केला जात आहे