केज व परळी विधानसभा मतदारसंघात डीएम व एनएम ला नो चॅलेंज

.
अंबाजोगाई (प्रतिनिधी)-
केज विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार नमिताताई मुंदडा व परळी विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडे आमदार विद्यमान पालकमंत्री आहेत तर केजच्या आमदार सत्ताधारी पक्षाच्या आहेत दोन्हीही मतदार संघाचा राजकीय दृष्टया विचार केला तर गेली चार वर्ष नऊ महिने शांत असणारे आजचे इच्छुक विरोधी उमेदवार अचानक सक्रिय कसे झाले आहेत कोणत्याही उमेदवारावर विरोधी पक्षात एकमत होत नसल्याचे चित्र सध्यातरी दिसत आहे ऐनवेळी विरोधी उमेदवार जनमत तयार करू शकतील का ?असाही सवाल दोन्ही विधानसभा मतदारसंघातील जनतेतून केला जात आहे
केज विधानसभेचा विचार केला तर भाजपाच्या विद्यमान आमदार एनएम यांनी आपले राजकीय वजन वापरून सरकारकडून एवढा निधी आणला आहे की अंबाजोगाई केज नेकनुर या शहरासह ग्रामीण भागातील रस्त्यासह सर्व समाजासाठी आणलेला निधीचा विचार केला तर एकही समाज या निधीतून सुटला नाही त्यामुळे केज विधानसभा मतदारसंघात विरोधी उमेदवार काय आरोप करणार आज केज मतदार संघात एनएमच्या विरोधी उमेदवारात एक नाही अनेक उमेदवार आहेत आचारसंहिता लागू व्हायला अवघ्या पंधरा-वीस दिवसाचा अवधी शिल्लक आहे अजूनही कोणत्याही पक्षाने आपला अधिकृत उमेदवार कोण राहील हे जाहीर केले नाही फक्त काही इच्छुक उमेदवारांना वाटते स्पर्धा ठेवून बक्षीस ठेवले की केज विधानसभा मतदारसंघातील जनता आपल्याला निवडून देईल विरोधी एकही इच्छुक उमेदवाराने गेली पावणे पाच वर्षात केज विधानसभा मतदारसंघात मतदारांना आपला चेहरा कसा आहे तो दाखवला नाही विद्यमान आमदाराच्या विरुद्ध बोलायला मुद्दा नाही मग येत्या विधानसभा निवडणुकीत कोणत्या मुद्द्यावर विरोधी उमेदवार मतदारांना मते मागणार आहेत
परळी विधानसभा मतदारसंघात तर विद्यमान आमदार पालकमंत्री डीएम यांनी गेल्या पाच वर्षात विधानसभा मतदारसंघातील जनतेसाठी काय काय केले आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड विकासाचे स्वतःचेच त्यांनी मोडीत काढले आहेत अशी चर्चा आहे परळी विधानसभा मतदारसंघात विरोधी उमेदवार कोण ? असा प्रश्न केला जातो तेव्हा तिथे सुद्धा हाच प्रश्न निर्माण होतो गेली चार वर्ष नऊ महिने झाले कोणीही जनतेच्या प्रश्नावर रस्त्यावर लढायला सोडा सोडवायला कोणीही आले नाही डीएम मतदारसंघातील कुठेही नैसर्गिक आपत्ती असो कृत्रिम आपत्ती आली तरी अर्ध्या रात्री घटनास्थळी पोहोचून नुसती कोरडी सहानुभूती दाखवत नव्हते तर पूर्णपणे त्या पिडीतेच्या पाठीशी ताकद लावत होते त्यामुळे परळी विधानसभा मतदारसंघात एकच नारा घुमतोय ओन्ली डीएम आता विरोधी इच्छुक उमेदवार आहेत कोणाला आघाडीची उमेदवारी मिळते हे पाहावे लागेल