माजलगाव विधानसभेच्या उमेदवारीचे आश्वासन मिळताच केजच्या संवाद मेळाव्याची तारीख पुढे ढकलली

.
अंबाजोगाई (प्रतिनिधी )-
केज विधानसभा मतदारसंघातून केजच्या विद्यमान नगराध्यक्ष सीताताई बनसोड यांची उमेदवारी निश्चित करण्यासाठी सर्व संमतीने मतदार संघातील प्रमुख कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा येत्या 13 सप्टेंबर रोजी आयोजित केला होता यामागे भाजपच्या प्रमुख नेत्याची भूमिका होती वरिष्ठ नेतृत्वाने याची गंभीर दखल घेत त्या नेत्याला माजलगाव विधानसभेच्या उमेदवारीचे आश्वासन देताच केजच्या संवाद मेळाव्याची तारीख पुढे ढकलण्यात आल्याची चर्चा होत आहे
बीड जिल्ह्यातून चार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व दोन भाजप अशा सहाही विधानसभा जागेवर महायुतीचा विजय होणार असल्याचा दावा यापूर्वीच करण्यात आला यामुळे माजलगाव विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी अजित पवार गटालाच सुटल्यास आपल्याला संधी मिळणार नसेल तर किमान केज मतदार संघाचा आमदार आपल्या विचाराचा यावा म्हणून भाजपाच्या नेत्याने भाजप उमेदवाराला पर्यायी उमेदवार देण्यासाठी चाचणी केली त्यात विद्यमान नगराध्यक्ष सीताताई बनसोड सर्वमान्य उमेदवार यशस्वी होऊ शकतात असा विश्वास वाटल्याने 13 सप्टेंबर रोजी केजला मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्याचे आयोजन केले गेले मेळाव्याची जय्यत तयारी झाली होती हा मेळावा यशस्वी होऊ शकतो अशीही मतदारसंघात चर्चा सुरू झाली होती
महायुतीच्या नेत्या कडून उमेदवारीचे आश्वासन ?
केज येथे होणाऱ्या संवाद मेळाव्या अगोदर महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी भाजप नेत्यांना बोलावून माजलगाव मतदार संघातून आपणच उमेदवार निश्चित आहात विनाकारण गडबड करू नका असे आश्वासन मिळताच भाजप नेत्यांनी काल केज येथे घोंगडी बैठकीच्या निमित्ताने नगराध्यक्ष सीताताई बनसोड यांच्या वतीने लावलेल्या पोस्टरवर भाजप नेत्याचे फोटो झळकत होते मात्र तात्काळ ते फोटो बॅनर वरून हटवा असा निरोप आला बॅनर हटवले तर वेगळी चर्चा होईल म्हणून त्या बॅनर वरील भाजप नेत्याच्या फोटोवर स्टिकर लावून फोटो झाकण्यात आल्याचे समजते बॅनर लावल्यानंतर अनेकांनी त्या बॅनरचे फोटो आपआपल्या मोबाईल मध्ये कैद केले होते आता स्टीकर लावल्याचेही फोटो मोबाईल मध्ये घेण्यात आले आहेत माजलगाव विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या सर्वच पक्षातून इच्छुकांची भाऊ गर्दी असताना वरिष्ठ नेत्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता नक्की होईल का ?अशीही चर्चा आता होऊ लागली आहे उमेदवारी अंतिम झाल्यानंतरच नक्की काय ते समजेल तूर्त तरी केज विधानसभा मतदारसंघातून पर्यायी उमेदवारी संदर्भात काय होते याकडे केज विधानसभा मतदारसंघातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे