मोदींना सोडून समर्थक भाजपामध्ये प्रवेश का करू लागलेत

सब टायटल: 
हा परिणाम सत्तेचा की कानाजवळ असणाऱ्या कानफुक्याचा ?
Rajkiya

.

     अंबाजोगाई (प्रतिनिधी )-

अंबाजोगाई शहरात गेली वीस-पंचवीस वर्षांपासून राजकारणात दोनच सत्ता केंद्र आहेत अंबाजोगाई नगरपरिषद दुसरे केज विधानसभा दोन्ही क्षेत्रात मोदी- मुंदडा दोनच नेतृत्व आज पावतो कायम आहेत विधानसभा निवडणूक जवळ येताच माजी नगराध्यक्ष पापा मोदी यांना सोडून अनेक समर्थक भाजपामध्ये ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा यांच्या नेतृत्वाखाली  प्रवेश करत आहेत हा परिणाम मोदी कडे सत्ता नसल्याचा आहे की त्यांच्या कानाजवळ असणाऱ्या कान फुक्याचा ? अशी आता जोरात चर्चा राजकीय क्षेत्रात सुरू आहे 

           गेल्या अनेक वर्षापासून अंबाजोगाई शहरातील जनतेचा कल नगरपरिषदेला मोदी व विधानसभा निवडणुकीत मुंदडा असा राहिला आहे जनतेचा कल आगामी निवडणुकीसाठी काय असेल जनतेलाच माहीत इकडे गेली चार वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला मोदी सध्या सत्तेच्या बाहेर आहेत आपल्या पाठीशी राजकीय कवच असावे म्हणून त्यांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला आज ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात आहेत मुंदडा नगर परिषदेच्या राजकारणात कधीच पडत नव्हते मात्र यावेळी नगराध्यक्ष निवडणुकीच्या मैदानात ते स्वतः उतरणार अशी चर्चा आहे खरे काय खोटे काय नेमके काय त्यांचे त्यांनाच ठाऊक मात्र सध्या विधानसभा निवडणूक जवळ आली आहे त्यामुळे मुंदडांनी मोदींच्या जवळ असणाऱ्या जवळपास बहुतांशी कार्यकर्त्यांना भाजपात प्रवेश दिलाय त्यामुळे मोदीच्या गोटात अस्वस्थता पसरणे स्वभाविक आहे केजला मुंदडा विरोधी उमेदवार देण्यासाठी मेळावा आयोजित केला आहे त्यात माजी नगराध्यक्ष मोदींची प्रमुख भूमिका असल्याचीही चर्चा गेल्या काही दिवसापासून जोरात सुरू असल्याने मुंदडांनी मोदी यांच्या समर्थकांना लक्ष्य केल्याचे बोलले जात आहे मात्र नक्की काय त्या दोघांनाच ठाऊक सोशल मीडियावर हे प्रवेश मोदी जवळ असणाऱ्या कान फुक्यामुळे होत आहेत असा कयास लावला जात आहे      

                राजकारणात नेता कोणीही असो कितीही मोठा असो किंवा छोटा असो प्रत्येक पुढार्‍याकडे असणाऱ्या कान फुक्याचे महत्व अनन्य साधारण राहिले आहे त्यामुळे कान फुके सर्वत्र असतात नेत्यांनी ठरवायचे असते कोणता निर्णय स्वतःच्या सद्सद विवेक बुद्धीला स्मरून घ्यायचा कोणता निर्णय कान फुक्याचे ऐकून घेऊन सुद्धा योग्य की अयोग्य ठरवायचा !