केज विधानसभा मतदारसंघासाठी केजच्या नगराध्यक्षा बनसोड ठरू शकतात पर्यायी उमेदवार ?

सब टायटल: 
येत्या 13 सप्टेंबर रोजी प्रमुख कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा केज मध्ये होणार
Rajkiya

.

         अंबाजोगाई (प्रतिनिधी)-  

केज विधानसभा मतदारसंघातून अनेक इच्छुक उमेदवार विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत जो तो आपआपल्या परीने प्रयत्न करत आहेत मात्र आम सहमती कोणत्याच उमेदवारा संदर्भात अद्याप तरी झालेली दिसत नाही केज नगरपंचायतच्या नगराध्यक्ष सीताताई बनसोड यांच्या नावावर सर्वांची सहमती दिसू लागल्याने त्यांच्या उमेदवारीवर शिक्का मोर्तब  करण्यासाठी येत्या 13 सप्टेंबर रोजी केजला बीड रोडवरील मंगल कार्यालयात केज विधानसभा मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा आयोजित केला असून त्यादिवशी नगराध्यक्ष बनसोड पर्यायी उमेदवार म्हणून घोषित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे 

                  केज विधानसभा मतदारसंघातून अनेक इच्छुक उमेदवारांनी आपआपल्या परीने मतदारसंघात संपर्क दौरे करून आपण कसे पात्र उमेदवार आहोत हेच अप्रत्यक्षरीत्या मतदारांना दाखवण्याचा प्रयत्न केला तर काहींनी थेट पत्रकार परिषद घेऊन आपली उमेदवारी जाहीर केली आहे मात्र कोणत्याही उमेदवाराच्या उमेदवारीवर प्रमुख नेत्यांमध्ये आम सहमती झालेली दिसत नाही केज विधानसभा मतदारसंघातील अनेक राजकीय जानकार यांनी एकत्र येत केजच्या नगराध्यक्ष सीताताई बनसोड यांना विधानसभेचे उमेदवारी दिली तर थ्री एम पॅटर्न लागू होऊन सर्वसामान्य उमेदवार म्हणून त्यांना मान्यता मिळू शकते यावर एकमत झाल्यानंतर मतदार संघातील प्रमुख नेत्याशी या राजकीय जाणकारांची चर्चा झाली त्या सर्व राजकीय नेत्यांनी आपली संमती दिल्यानंतर उमेदवारी संदर्भात हालचाली सुरू झाल्याचे समजते प्राप्त माहितीनुसार सर्वात प्रथम पहिली पसंती मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला तर त्यांच्याकडे अगोदरच उमेदवारीसाठी विनंती करण्यात आल्याचे समजते सर्व राजकीय नेत्यांच्या मते जर पाटील यांनी उमेदवार उभा केले नाही तर राष्ट्रवादी शरद पवार गटाची उमेदवारी घ्यावी असे दोन पर्याय उमेदवारी संदर्भात प्रमुख नेत्यांनी सुचवल्याचे समजते 

            येत्या 13 सप्टेंबर रोजी केज येथे बीड रोडवरील मंगल कार्यालयात केज विधानसभा मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा आयोजित केला असून या मेळाव्याला केज मतदार संघातील राजकीय पकड मजबूत असलेले भाजपाचे दोन ते तीन नेते त्यानंतर अंबाजोगाई शहरातील राजकारणावर गेली पंधरा-वीस वर्षापासून राजकीय वर्चस्व असणारे माजी नगराध्यक्ष त्यासोबत दोन माजी उपनगराध्यक्ष सहकार क्षेत्रातील अनेक नेत्यासोबत बनसोडे यांच्या उमेदवारी संदर्भात चर्चा झाल्यानंतर सर्वांनी एकत्र येऊन पर्यायी उमेदवार केज विधानसभा निवडणुकीत उतरून खांदेपालट करण्याचा निर्णय घेतल्यामुळे येत्या 13 सप्टेंबर रोजी केजच्या नगराध्यक्ष सीता ताई बनसोड पर्यायी उमेदवार म्हणून घोषित होतात का ? हेच पहावे लागेल कोण कोण नेते या संवाद मेळाव्याला उघड व्यासपीठावर येऊन आपली भूमिका मांडतात याकडे केज विधानसभा मतदारसंघातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे