अंबाजोगाई तालुका संजय गांधी निराधार समितीच्या अध्यक्षपदी सुधाकर शिनगारे यांची निवड

सब टायटल: 
पालकमंत्री मुंडे बोलत नाहीत करून दाखवतात सिद्ध झाले
Rajkiya

.

            अंबाजोगाई (प्रतिनिधी)-  

अंबाजोगाई तालुका संजय गांधी निराधार योजना समितीची आज निवड जाहीर झाली आहे त्यात समितीच्या अंबाजोगाई तालुकाध्यक्षपदी बर्दापूर येथील सुधाकर पंढरी शिनगारे यांना अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे समितीत दहा अशासकीय सदस्यांची निवड झाली त्यातील सर्व परळी विधानसभा मतदारसंघातील सदस्य दिसत आहेत 

        बीडचे जिल्हाधिकारी यांनी काल सदरील निवडीचे पत्र काढले आहे त्यात सुधाकर शिनगारे बर्दापूर अध्यक्ष तर हनुमंत गायकवाड (तळणी) सौ मीरा व्यंकटराव सोनवणे (सोमनवाडी) सौ मीरा दिलीपराव जगताप (मुडेगाव) लिंबराज लहाने (बागझरी) शिवराज इंगळे (जोडवाडी) नवनाथ जाधव (राडी) डॉ अब्दुल समद अब्दुल अजीज (घाटनांदुर) शिवाजीराव गीते (चंदनवाडी) बलभीम शिंदे (सुगाव) आदींची सदस्य पदी निवड करण्यात आली आहे हे अशासकीय सदस्य आहेत शासकीय सदस्य म्हणून अंबाजोगाईचे पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी व तहसीलदार असतील असेही जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात म्हटले आहे आता कमी कालावधीत या समितीला आपले काम दाखवावे लागणार आहे 

     पालकमंत्री धनंजय मुंडे ठोस निर्णय घेतात 

        बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे जे ठरवतात ते करून दाखवतात असा आजपर्यंतचा अनेक राजकीय नेत्यांचा अनुभव तर आहे नव्हे इतिहास आहे परळी विधानसभा निवडणुकीत मी पंकजाताई मुंडे यांना लीड देईल असे आश्वासन पालकमंत्री मुंडे यांनी दिले होते त्यासाठी त्यांनी प्रयत्नाची परकाष्टा केली त्यांच्या जोडीला सहकारी वाल्मीक अण्णा कराड सारखा साथीदार होता ही साखळी ग्रामीण भागापर्यंत असल्याने हे शक्य होऊ शकले जिल्ह्यात राजकीय असो की शासकीय निर्णय घेऊन अंमलबजावणी करणारा धाडसी नेता म्हणून पालकमंत्री धनंजय मुंडे यांची ख्याती आहे आजपर्यंत त्यांनी जे सांगितले ते करून दाखवले त्याचाच एक भाग संजय गांधी निराधार समितीत 10 जणांचा परळी विधानसभा मतदारसंघातील अशासकीय सदस्य म्हणून निवड करण्यात आली हे सर्वजण परळी विधानसभा मतदारसंघातील आहेत अंबाजोगाई शहरात अनेक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटात आपण पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या अत्यंत जवळ असल्याचा देखावा सतत अंबाजोगाई शहरात निर्माण करतात मात्र या समितीमध्ये अशा बडेजाव दाखवणाऱ्या एकाही नेत्याच्या समर्थकांचा समावेश नसल्याने हा बनाव खोटा असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे पालकमंत्र्यांनी जे बोलले ते करून दाखवले अशीही चर्चा होत आहे