सरकार व सर्व राजकीय पक्षातील लबाड पुढार्याबद्दल जनतेत प्रचंड असंतोष पसरला आहे

.
अंबाजोगाई (प्रतिनिधी )-
राजकारणात खरे बोलण्याची कोणीच हिंमत करत नाही त्यातल्या त्यात भाजपा सारख्या पक्षात अंबाजोगाई तालुक्याचे भाजपाचे तालुकाध्यक्ष अच्युत बापू गंगणे यांनी आज एक प्रसिद्धी पत्रक काढले असून त्यात स्पष्टपणे त्यांनी सरकार व सर्वच राजकीय पक्षातील लबाड पुढार्याबद्दल जनतेत प्रचंड असंतोष असल्याचे म्हटले आहे भाजपाचे तालुकाध्यक्षांनी स्वतःच्या भाजपाला घरचा आहेर का दिला ? अशी चर्चा होत आहे
भाजपाचे तालुकाध्यक्ष अच्युत बापू गंगणे यांच्यासह प्रसिद्धी पत्रकावर नारायण पांडे शिवराज खरबड उत्तमराव माने आदी चौघाजणांच्या स्वाक्षऱ्या आहेत प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की गेल्या तीन वर्षापासून शेतकरी सोयाबीन घरात ठेवून बसला आहे आज उद्या सोयाबीनला भाव होईल अशी आशा शेतकऱ्यांना होती परंतु सरकार सोयाबीनचे भाव दिवसेंदिवस घसरत जातील अशीच परिस्थिती निर्माण करत आहे आठ ते दहा हजारावरती गेलेले सोयाबीनचे बाजारभाव आता पामतेल जवळपास 21 लाख टन आयात केल्यामुळे भाव फार रसातळाला गेले आहेत अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या मनात सरकार व सर्व राजकीय लबाड पुढार्याबद्दल प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे त्या असंतोषाला वाचा होण्यासाठी व सोयाबीनच्या भावाबद्दल होत असलेला अन्याय दूर करण्यासाठी येत्या सप्टेंबर महिन्यात अंबाजोगाई येथे सोयाबीनवर राज्यस्तरीय महा अदालत होणार आहे त्याची तारीख व वेळ लवकरच घोषित करण्यात येईल असेही पत्रकात म्हटले आहे
या महाअदालत मध्ये सरकारचे पामतेल आयात निर्यात विषय धोरण , सोयाबीनची उत्पादकता वाढविण्यासाठी तंत्रज्ञान विरोधी सरकारचे धोरण, सोयाबीन उत्पादन खर्च वाढल्यामुळे सोयाबीनचे हमीभाव वाढवून मिळावेत व तात्काळ सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे इत्यादी विषयावर या महादलत मध्ये चर्चा होऊन निर्णय होतील प्रसिद्धी पत्रकावर अच्युत बापू गंगणे सह तिघा मान्यवरांच्या स्वाक्षऱ्या आहेत भाजपाच्या तालुकाध्यक्ष शेतकऱ्याच्या प्रश्नावर आपल्या सरकारला आरसा दाखवणारे भाजपाचे तालुकाध्यक्ष अच्युत बापू गंगने हे पहिलेच असतील अशीही चर्चा होत आहे