केज विधानसभेत पर्याय शोधण्यासाठी खासदाराची अनेक नेत्यांशी गुप्तखलबते ?

सब टायटल: 
पक्ष अभिनिवेश सोडून अनेक नेते गण एकत्र येण्याची शक्यता
Rajkiya

.

         अंबाजोगाई (प्रतिनिधी)-  

                  केज विधानसभा मतदारसंघात सक्षम पर्याय देण्यासाठी बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे कसोशीने प्रयत्न करत असून त्याचाच एक भाग म्हणून अंबाजोगाई शहरात काल खासदार आले होते त्यांच्या भेटीला मातब्बर नेते अज्ञातस्थळी येऊन बंद दाराआड चर्चाही झाली मात्र अद्याप कोणत्याही नावावर एकमत झाले नसल्याचे समजते ही पहिली बैठक होती अनेक बैठकीनंतर अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे 

                      बीड लोकसभा निवडणुकीत बजरंग सोनवणे यांना अनेकअदृश्य शक्तीनी अंधारातून साथ दिली त्या अदृश्य शक्तींना खासदारांनी कधीच उजेडात आणले नाही एखाद्या घटनेचा अपवाद वगळता अजूनही लोकसभा निवडणुकीत मदत करणारे हात खासदारांसोबत मजबुतीने सोबत असल्याचे समजते 

          बीड जिल्ह्याची राजकीय परिस्थिती पाहता पवार गटाला मोठी बीड जिल्ह्याकडून आशा आहे खासदार केजचे निवासी आहेत त्यामुळे केज विधान सभेसह सर्वच ठिकाणी आपल्या नेतृत्वात आमदार निवडून आणण्यासाठी त्यांनी सध्या जुळवाजुळ सुरू केल्याचे समजते त्याचाच एक भाग म्हणून खासदार बजरंग सोनवणे काल संध्याकाळी अंबाजोगाई शहरात दाखल झाले स्थळ व येणाऱ्या व्यक्ती यांना नेमके कुठे यायचे याची कल्पना असल्याने एका अराजकीय व्यक्तींच्या घरी अंबाजोगाई येथील स्थानिक विविध राजकीय नेत्याशी खासदारांनी बंद दाराआड चर्चा केली नेमकी काय चर्चा झाली संभाव्य कोणकोणत्या उमेदवारावर चर्चा झाली पुढची भेट कधी ? हे सर्व ठरले मात्र ही बाब अजून गोपनीय ठेवण्यात आली असल्याचे समजते आता पुढची बैठक कुठे व कधी होते व काय निर्णय होतो याकडे अंबाजोगाई सह सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे